Ads

Wednesday, May 5, 2021

IPL 2021: आठ खेळाडूंनी भारत सोडला, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची मात्र कोंडी

नवी दिल्ली: आयपीएलचा १४वा हंगाम स्थगित केल्यानंतर परदेशी खेळाडूं घरी कसे जातील हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक देशांनी भारतात करोना रुग्णांची संख्या अधिक असल्याने विमान सेवा बंद केली आहे. यामुळे काही देशातील खेळाडू अडकले आहेत. बीसीसीआयने मंगळवारी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याची घोषणा केली. त्यानंतर इंग्लंडचे ८ खेळाडू बुधवारी लंडनसाठी रवाना झाले. पण ऑस्ट्रेलियातील खेळाडू मात्र पेचात अडकले आहेत. त्यांना मालदीव आणि श्रीलंके थांबावे लागले आणि तेथून ऑस्ट्रेलियात जावे लागण्याची शक्यता आहे. वाचा- आयपीएल स्थगितीची घोषणा झाल्यानंतर काही तासातच दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूंनी अहमदाबादवरून दिल्ली गाठली आणि तेथून ते लंडनच्या हीथ्रो विमानतळाला जाणारे विमान पकडले. वाचा- ज्या खेळाडूंनी दिल्लीतून विमान पकडले त्यामध्ये जॉनी बेयरस्टो, जोस बटलर, सॅम बॅलिंग्स, ख्रिस वॉक्स, मोइन अली, जेसन राय, सॅम करन आणि टॉम करन यांचा समावेश आहे. या सर्वांनी बुधवारी सकाळी विमान पकडल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. इंग्लंडमध्ये पोहोल्यानंतर त्यांना सरकारने ठरवून दिलेल्या हॉटेलमध्ये क्वारंटाइन व्हावे लागले, असे इंग्लंड बोर्डाच्या प्रवक्त्याने सांगितले. या शिवाय जे खेळाडू आयपीएल खेळत होते. त्यामध्ये इयान मॉर्गन, डेव्हिड मलान आणि ख्रिस जॉर्डन हे पुढील ४८ तासात भारतातून बाहेर पडतील. वाचा- ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची अचडण... आयपीएलमध्ये सहभागी झालेले ऑस्ट्रेलियाचे खेळाडू, कोच, अंपायर आणि अन्य स्टाफ मेंबर यांची संख्या ३८ इतकी आहे. या सर्वांना घरी जाण्यासाठी मात्र फार वाट पाहावी लागणार आहे. ऑस्टेलिया सरकारने भारतातून येण्यास १५ मे पर्यंत बंदी घातली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या माहितीनुसार या सर्वांना भारतातून बाहेर पडण्यासाठी दोन ते तीन दिवसात चार्टड विमान मिळेल. यासंदर्भात बीसीसीआयने देखील पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. या सर्वांसाठी चार्टड विमान उपलब्ध करून दिले जाणार आहे. जेणेकरून ते सुरक्षितपणे ऑस्ट्रेलियात पोहोचू शकतील. बीसीसीआयचे लक्ष्य सर्व खेळाडूंना सुरक्षितपणे घरी पोहोचवण्याचे आहे. चेन्नई सुपर किंग्जचे फलंदाजीचे प्रशिक्षक मायकल हसी यांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना भारतात क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण करावा लागले.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3umTbM2

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...