Ads

Tuesday, May 4, 2021

SOPचे तीन तेरा वाजवले, IPL 2021 मध्ये कुठे झाला हलगर्जीपणा; वाचा Exclusive वृत्त

मुंबई : भारतीय क्रिकेट बोर्डाने आयपीएलचा १४वा हंगाम स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यामुळे क्रिकेट चाहते नक्कीच नाराज झालेत. करोनाच्या काळात झालेली ही काही पहिली आयपीएल नव्हे याआधी गेल्या वर्षी देखील करोनाचा धोका असताना आयपीएलचे आयोजन झाले होते. पण तेव्हा स्पर्धा निट पार पाडली असताना यावर्षी नेमके कुठे चुकले? वाचा- गेल्या वर्षी करोनामुळे बीसीसीआयने आयपीएलचा १३वा हंगाम पुढे ढकलला होता. मार्च महिन्यात होणारी ही स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात यशस्वीपणे पार पाडली गेली. या वर्षी ही स्पर्धा भारतात खेळवण्याचा निर्णय झाला. या दोन्ही आयोजनात बायो बबलची निर्मिती करण्यात आली होती. असे असाना देखील नेमके कुठे चुकले ते जाणून घेऊयात... वाचा- ... आयपीएल २०२०चे यशस्वी आयोजन आणि आयपीएल २०२१चे अपयश या दोन्ही गोष्टीत एक गोष्ट महत्त्वाची ठरली ती म्हणजे Standard Operating Procedure होय. गेल्या वर्षी युएईमध्ये झालेल्या स्पर्धेत SOPचे काटोकारपणे पालन झाले होते. युएईमध्ये बायो बबलची निर्मिती इंग्लंडमधील एका आयटी आणि सुरक्षा कंपनी Restrata ने केली होती. वाचा- या वर्षी मात्र बायो बबलमध्ये अनेक त्रुटी होत्या. यामुळेच थेट खेळाडूंना करोनाची लागण झाली. बायो बबल म्हणजे जैव सुरक्षित वातावरण काही नियम ठरले आहेत. त्याचे कठोर पालन केले तरच बायो बबल सुरक्षित राहतो. या वर्षी मध्ये बायो बबल गोष्टीत खालील बाबींचा समावेश केला गेला होता. वाचा- १)हॉटेल २)सराव सत्र ३)सामन्याचे ठिकाण ४) वाहतूक बीसीसीआयचे SOP अपयशी ठरले या वर्षी बायो बबल करताना काही मोठ्या चूका झाल्या ज्यामुळे करोनाची लागण खेळाडू आणि अन्य लोकांना झाली. या वर्षी बीसीसीआयने १२ बायो बबल तयार केले होते. ते खालील प्रमाणे होते. >> आठ संघ आणि त्यांचा सपोर्ट स्टाफ- ८ बबल >> सामना अधिकारी आणि व्यवस्थापन टीम- २ बबल >> समालोचक आणि अन्य सदस्य- २ बबल वाचा- आयपीएल २०२० मध्ये युएईत बीसीसीआयने इंग्लंडमधील कंपनीला बायो बबल तयार करण्याचे काम दिले होते. या वर्षी बीसीसीआयने रुग्णालय आणि चाचणी करणाऱ्या लॅबच्या भरवश्यावर आयपीएल आयोजित केली. यासाठी कोणतेही ठोस कारण देखील दिले नाही. प्रत्येक संघाने त्यांचे स्वत:चे बायो बबल तयार केले होते. यात खेळाडू आणि त्यांचे कुटुंबीयांचा समावेश होता. यात गाउंड स्टाफचा समावेश कुठेच करण्यात आला नव्हता. अतिरिक्त वाहन चालकांचा बायो बबलमध्ये समावेश करण्यात आला नाही. वाचा- खेळाडू ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तेथील कर्मचाऱ्यांना १४ दिवसांचे क्वांरटाइन बंधनकारक करण्यात आले नाही. त्याच बरोबर खेळाडूंसाठी जेवण करणारे स्वयंपाकी यांच्याबाबत कोणत्याही प्रकारची काळजी घेतली गेली नाही. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून त्यांचा १४ दिवसांचा क्वारंटान कालावधी निश्चित करण्यात आले नाही. याची जबाबदारी त्यांची त्यांना घेण्यास सांगितले गेले. युएईमध्ये झालेल्या स्पर्धेत ज्या कंपनीकडे बायो बबलची सुरक्षा सोपवली होती. त्यांचे कर्मचारी देखील बायो बबलचा भाग होते. बीसीसीआयकडून एक डिव्हाइस देण्यात आले होते. हे जीपीस डिव्हाइस प्रत्येकाला हातावर घालणे बंधनकारक होते. बीसीसीआयकडून प्रत्येक संघांना देण्यात आले होते. ज्यामुळे प्रत्येकाची हलचाल कळू शकेल. पण या वर्षी अशी माहिती समोर येत आहे की जीपीएस डिव्हाइस काम करत नव्हते. बीसीसीआयने या वर्षी अनेक गोष्टींमध्ये त्रुटी ठेवल्या या हलगर्जीपणामुळेच स्पर्धा स्थगित करण्याची वेळ आली.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2QS0pJm

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...