नवी दिल्ली: बायो बबलची सुरक्षा असताना आयपीएलच्या १४व्या हंगामात करोनाने प्रवेश केला आणि स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करावी लागली. देशात गेल्या काही कालावधीत करोना रुग्णांची संख्या वाढत असताना आयपीएल स्पर्धा सुरू होती. पण बायो बबलमधील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील व्यक्तींना कोरना झाल्याने बीसीसीआये ही स्पर्धा स्थगित केली. वाचा- सोमवारी कोलकाता संघातील दोन खेळाडू, त्यानंतर संघातील गोलंदाजीचे कोच बालाजी, सीईओ आणि बस क्लिनर यांना करोना झाला. मंगळवारी सकाळी सनरायझर्स हैदराबादचा वृद्धीमान साहा आणि त्याने दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा यांना करोना झाल्याचे रिपोट आले. दरम्यानच्या बीसीसीआय आणि आयपीएलच्या गव्हर्निंग काउंसिलने स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. वाचा- मंगळवारी रात्रीपर्यंत या सर्वा घडामोडी घडत असताना आणखी एका व्यक्तीला करोना झाल्याची बातमी आली. चेन्नई सुपर किंग्जचे फलंदाजीचे कोच यांना करोना झाला. एक दिवस आधी गोलंदाजीचे कोच बालाजी याला करोना झाला होता. हसी यांची दोन वेळा चाचणी केली गेली आणि दोन्ही चाचणीचे रिपोट पॉझिटिव्ह आले आहेत. वाचा- मायकल हसी आणि चेन्नई सुपर किंग्जचे फार जुने नाते आहे. मिस्टर क्रिकेट नावाने हसी यांची ओळख आहे. चेन्नईसाठी आयपीएलमधील पहिले शतक हसी यांनी झळकावले होते. २००८च्या पहिल्या हंगामापासून ते २०१३ पर्यंत ते चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत होते. त्यानंतर २०१४ साली ते मुंबई इंडियन्सकडून खेळले निवृत्तीनंतर २०१८ साली ते पुन्हा चेन्नई संघात फलंदाजीचे कोच म्हणून परतले. वाचा- ... चेन्नई सुपर किंग्जचे सर्व खेळाडू दिल्लीतच असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व खेळाडूंचा करोना रिपोट नेगेटिव्ह आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3xMFnwn
No comments:
Post a Comment