नवी दिल्ली: करोना व्हायरसमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि आयपीएलच्या गव्हर्निंग काउंसिलने स्पर्धेचा १४वा हंगाम स्थगित करण्याचा निर्णय घेतला. बायो बबलमध्ये असलेल्या काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना करोनाची लागण झाल्याने हा निर्णय घेतला गेला. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर आयपीएलला स्थगिती म्हणजे ती रद्द अशी चर्चा सुरू झाली आहे. यावर बीसीसीआयकडून उत्तर आले आहे. वाचा- आयपीएलचे चेअरमन यांनी या संदर्भात स्पष्टपणे सांगितले की, करण्यात आली आहे रद्द नाही. स्पर्धा पुन्हा कधी, कुठे आणि केव्हा आयोजित करावी याचा विचार करत आहोत. वाचा- अचानक चार खेळाडूंना करोना झाल्याने पूर्व नियोजित कार्यक्रम बदलने योग्य नाही. त्याच बरोबर काही खेळाडू देखील वातावरणावरून नाराज होते. एडम झम्पासह काही खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली होती. तर भारतीय खेळाडू अश्विनने देखील कुटुंबीयांना करोना झाल्याने माघार घेतली होती. यामुळे अन्य खेळाडूंमध्ये नाराजी वाढली होती. वाचा- गव्हर्निंग काउंसिल आयपीएलमधील उर्वरित सामने आयोजित करण्यावर विचार करत आहे. त्याच्या नव्या तारखा कोणत्या असतील यासंदर्भात आम्ही योजना तयार करत आहोत. सध्या देशात करोनामुळे परिस्थिती ठिक नाही. या शिवाय आणखी गोष्टींचा विचार करावा लागले. वाचा- आयपीएलमध्ये अद्याप ३१ लढती शिल्लक आहेत. त्यामुळे थोडी वाट पाहावी लागले. टी-२० वर्ल्डकपच्या आधी किंवा नंतर विंडो मिळते का यावर विचार सुरू असल्याचे ते म्हणाले. वाचा- आयपीएलचा १४वा हंगाम युएईमध्ये खेळवण्याचा गव्हर्निंग काउंसिलची शिफारस होती याबद्दल पटेल यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. आम्हाला परिस्थिती इतकी खराब होईल याची कल्पना नव्हती. पण युएई हा एक पर्याय होता, असे ते म्हणाले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3xYtG5Y
No comments:
Post a Comment