Ads

Wednesday, May 5, 2021

IPL POSTPONED : धक्कादायक... आयपीएलच्या मैदानात सुरु होती सट्टेबाजी, पाहा कशी घडली मोठी चुक

नवी दिल्ली: आयपीएल सुरु असताना मैदानात कोणत्याच बाहेरच्या व्यक्तीला प्रवेश करण्याची परवानगी नव्हती. पण तरीही आयपीएलच्या मैदानातच सट्टेबाजी सुरु असल्याची धक्कादायक गोष्ट आता समोर आली आहे. त्याचबरोबर ही सट्टेबाजी कोणच्या मदतीने सुरु होती, याचे बिंगही आता फुटले आहे. आयपीएलचा १४वा हंगाम बीसीसीआयला करोनामुळे स्थगित करावा लागला. एका बाजूला बायो बबलमध्ये सुरक्षित वातावरणात या स्पर्धेचे आयोजन सुरू होते. पण दुसऱ्या बाजूला सामन्यांवर सट्टेबाजी सुरू होती, अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. ही सट्टेबाजी नेमकी कशी सुरु होती आणि सट्टेबाजांना मैदानात प्रवेश कसा मिळाला, ही गोष्ट आता उघड झाली आहे. आयपीएल सुरु असताना मैदानात फक्त दोन्ही संघ आणि संघातील काही व्यक्तींनाच प्रवेश दिला जात होता. पण तरीही सट्टेबाज मैदानात घुसले होते. यावेळी सट्टेबाजांनी मैदानातील सफाई कर्मचाऱ्यांची घेतली मदत घेतल्याचे आता समोर आले आहे. मैदानातील सफाई कर्मचाऱ्यांची मदत घेत सट्टेबाज आयपीएलचे सामने सुरु असलेल्या मैदानात प्रवेश करायचे आणि तिथूनच सट्टेबाजी करायचे, असा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. त्यामुळेचाहत्यांना या गोष्टीचा मोठा धक्का बसला आहे. हे सट्टेबाज मैदानातील सफाई कर्मचारी बनून मैदानात यायचे आणि प्रत्येक चेंडूची माहिती ते बाहेर पुरवत होते. त्यानुसार सट्टेबाजी होत होती. आता या दोन्ही सट्टेबाजांना दिल्लीच्या पोलिसांनी पकडले आहे. त्याचबरोबर दिल्लीतील राजस्थान आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील २ मे रोजी झालेल्या सामन्यातही जोरदार सट्टेबाजी झाल्याची माहिती आता समोर येत आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये कितीही सुरक्षा ठेवण्यात आली असली तरी सट्टेबाजीपासून या सामन्यांना कोणीही वाचवू शकलेले नाही, ही गोष्ट आता समोर येत आहे. त्यामुळे आता दोषींवर नेमकी कोणती कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. त्याचबरोबर आयपीएल पुन्हा सुरु झाल्यावर स्पर्धेत सट्टेबाजी होऊ नये, यासाठी कोणती खबरदारी घेण्यात येणार आहे, यावरही बीसीसीआयला विचार करावा लागेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3emboDM

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...