Ads

Thursday, May 6, 2021

IPL स्थगित झाले; खेळाडूंना पगार मिळणार का? काय आहेत नियम

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने मंगळवारी करोनामुळे आयपीएलचा १४वा हंगाम अनिश्चित काळापर्यंत स्थगित केला. स्पर्धेतील २९ सामने झाले आहेत. ३० वी लढत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात होणार होती. पण त्याआधी कोलकाता संघातील दोन खेळाडूंना करोना झाल्याने सामना स्थगित केला गेला. वाचा- सोमवारच्या घटनेनंतर मंळवारी होणाऱ्या हैदराबाद आणि मुंबई लढती आधी वृद्धीमान सहा आणि अमित मिश्रा तसेच मायकल हसी यांना करोना झाल्याचे समोर आले. आता बीसीसीआयकडून स्पर्धा स्थिगत झाल्याने खेळाडूंना मिळणाऱ्या पगाराचे काय असा सवाल सर्वांना पडला आहे. वाचा- स्पर्धा स्थगित करावी लागल्याने बीसीसीआयचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जे खेळाडू २०२१च्या आयपीएलमध्ये खेळले त्यांचे पैसे कसे देणार. आयपीएलच्या करारानुसार खेळाडूंना तीन टप्प्यात पैसे दिले जातात. यातील पहिला हप्ता स्पर्धा सुरू झाल्यानंतर खेळाडूंना दिला जातो. आता स्पर्धा स्थगित करण्यात आल्याने उर्वरीत दोन हप्ते थांबवण्यात आली आहे. आयपीएल २०२१ जेव्हा संपले तेव्हा ते दिले जातील. वाचा- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयकडून सप्टेंबर महिन्यात आयपीएलचे सामने खेळवले जाऊ शकतात. टी-२० वर्ल्डकपचा विचार करता शिल्लक सामने त्याच्या आधी होऊ शकतात. अर्थात भारतातील सध्याची करोना स्थिती पाहता टी-२० वर्ल्डकपचे आयोजन युएईमध्ये होण्याचा विचार सुरू आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3h2Mjzy

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...