Ads

Tuesday, May 11, 2021

IPL मध्ये भारतीय खेळाडूंना निर्बंध आवडत नव्हते; मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकांचे धक्कादायक वक्तव्य

मुंबई: करोना व्हायरसपासून संरक्षण मिळावे यासाठी बीसीसीआयने आयपीएलच्या १४व्या हंगामात बायो बबलची निर्मिती केली होती. पण आयपीएलचा हा सुरक्षित राहिला नाही आणि खेळाडूंना करोनाची लागण झाली. यामुळेच बीसीसीायने स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला. वाचा- बायो बबल संदर्भात अनेक खेळाडूंनी स्वत:ची मत व्यक्त केली. काहींच्या मते हा सर्वात अवघड काळ होता, तर काहींनी बायो बबलमध्ये राहिल्याने निराश वाटत असल्याचे सांगितले. वाचा- आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सचे फिल्डिंग कोच जेम्स पेमेंट यांनी एक धक्कादायक व्यक्तव्य केले आहे. बायो बबल संदर्भात बोलताना ते म्हमाले, बायो बबलमध्ये आम्हाला सुरक्षित वाटत होते. पण काही भारतीय सिनिअर खेळाडूंना ही गोष्ट आवडत नव्हती. त्यांना अनुशासनमध्ये राहणे अवघड वाटत होते. वाचा- भारताच्या सिनिअर खेळाडूंना नियमात राहण्यास अवडत नव्हते, असे जेम्स यांनी stuff.co.nz या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. वाचा- मुंबई इंडियन्सचा संघ जेव्हा चेन्नईत पोहोचला तेव्हा एका सपोर्ट स्टाफला करोनाची लागण झाली. तेव्हा त्याला जाणीव झाली की बायो बबल सुरक्षित नाही. जेम्स म्हणाले की, प्रवास करणे हे नेहमी आव्हानात्मक होते. चेन्नईत पोहोचल्यावर आमच्या पैकी एकाला करोना झाला. पण ते लवकर आयसोलेट झाल्याने आम्ही सुरक्षित राहिलो. वाचा- ... आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरिअर यांना करोनाची लागण झाली. त्यानंतर आयपीएलच्या आयोजनावर संकट आले. या दोन खेळाडूंनंतर इतरांना देखील करोना झाल्याने बीसीसीआयने स्पर्धा स्थगित केली.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bfeQOr

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...