नवी दिल्ली: बायो बबलमधील खेळाडू आणि अन्य लोकांना करोनाची लागण झाल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने आयपीएलचा १४वा हंगाम स्थगित केला होता. गेल्या वर्षी युएईमध्ये झालेली स्पर्धा या वर्षी भारतात घेण्याचा निर्णय घेतला होता. पण स्पर्धा सुरू असताना खेळाडूंना करोना झाल्याने स्पर्धा स्थगित झाली. वाचा- आयपीएलच्या १४व्या हंगामात अद्याप ३१ लढती शिल्लक आहेत. हे सामने कधी होणार याबाबत बीसीसीआयने अद्याप कोणतीही अपडेट दिली नाही. यासंदर्भात बोलताना बोर्डाचे अध्यक्ष ( ) म्हणाला, आयपीएलमधील उर्वरीत लढती भारतात होणार नाहीत. मध्ये २९ सामने झाले आहेत आणि ३१ लढती शिल्लक आहेत. वाचा- देशाच्या दौऱ्यावर... भारतात आयपीएलच्या उर्वरीत सामन्यांचे आयोजन होऊ शकत नाही. कारण देशात १४ दिवसांचा क्वारंटाइन संभाळणे अतिशय अवघड आहे. त्याच बरोबर आयपीएलचा १४वा हंगाम पूर्ण करण्यासाठी कोणता वेळ मिळेल किंवा उपलब्ध होईल याबाबत आताच बोलणे घाईचे ठरले. वाचा- इंग्लंडमधील काउंटी क्रिकेटमधील चार संघांनी आयपीएलच्या उर्वरीत ३१ सामन्यांचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भारतात या वर्षाच्या अखेरीस करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे देखील भारताबाहेर ही स्पर्धा पूर्ण करण्याचा विचार करत आहे. वाचा- सप्टेंबर महिन्यात भारतीय संघाचा इंग्लंड दौरा संपणार आहे. त्यानंतर आयपीएलमधील सामने इंग्लंडमध्ये होऊ शकतात. एका वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार इंग्लंडमधील काही मैदानांनी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला पत्र लिहून तशी इच्छा व्यक्त केली आहे. वाचा- दरम्यान भारतीय क्रिकेट संघ जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत ५ सामन्यांची टी-२० आणि ३ सामन्यांची वनडे मालिका खेळू शकतो. या मालिकेत भारतीय संघातील स्टार खेळाडू खेळू शकणार नाहीत. तेव्हा ते इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत असतील. त्यामुळे श्रीलंकेच्या दौऱ्यात विराट कोहली, रोहित शर्मा आदी खेळाडू असणार नाहीत, असे गांगुलीने सांगितले. वाचा- वक्तव्य
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2RDt8Sb
No comments:
Post a Comment