हरारे: झिम्बाब्वे आणि पाकिस्तान () यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना हरारे येथे सुरू असून या सामन्यात पाकिस्तानला आता विजयासाठी फक्त १ विकेटची गरज आहे. तिसऱ्या दिवशी यजमान झिम्बाब्वेने ९ बाद २९० धावा केल्या होत्या. वाचा- दौऱ्यावर झिम्बाब्वे फॉलोऑनमध्ये खेळत असून ते अद्याप १५८ धावांनी पिछाडीवर आहेत. पाकिस्तानलाच्या विजयाची औपचारिकता शिल्लक असून या सामन्यात झिम्बाब्वेचा ल्यूक जोंगवे या फलंदाजाने पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच दमछाक केली. वाचा- जोंगवे एकटाच लढा देत असून तो ३१ धावांवर नाबाद खेळत आहे. त्याच्या फलंदाजीमुळे कसोटी सामना चौथ्या दिवसापर्यंत गेला. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी त्याची विकेट घेण्यासाठी साम, दाम, दंड सर्व गोष्टींचा वापर केला पण जोंगवेची विकेट काही त्यांना घेता आली नाही. वाचा- वाचा- या सामन्यात ल्यूक आणि पाकिस्तानचा गोलंदाज हसन अली यांच्यात मैदानात राडा झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गोलंदाज अलीने ल्यूक जोंगवेचे लक्ष विचलित करण्यासाठी बरेच प्रयत्न केले. पण ल्यूकने देखील जशास तसे उत्तर दिले. वाचा- झिम्बाब्वेच्या दुसऱ्या डावात शाहिन आफ्रिदीने ४ तर नौमान अलीने ५ विकेट घेतल्या. ही कसोटी पाकिस्तानने जिंकल्यास ते दोन सामन्यांची कसोटी मालिका २-०ने जिंकतील.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bhMaoh
No comments:
Post a Comment