नवी दिल्ली: सुरक्षित मानल्या जाणाऱ्या बायो बबलमध्ये करोनाचा शिरकाव झाल्याने बीसीसीआयला आयपीएलचा १४वा हंगाम स्थगित करावा लागला. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता आयपीएल खेळणाऱ्या एका खेळाडूनेच बीसीसीआयला सुनावले आहे. वाचा- ऑस्ट्रेलियाचा जलद गोलंदाज पॅट कमिंन्स जो आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळत आहे. त्याने आयपीएलचे आयोजिक बीसीसीआय यांना तुम्ही गोष्टी अधिक चांगल्या करू शकला असता अशा शब्दात सुनावले आहे. या वर्षी करोनामुळे आयपीएल स्थगित करावी लागली. पण गेल्या वर्षी युएईमध्ये आयपीएलचे शानदार आयोजन करण्यात आले होते, असे तो म्हणाला. वाचा- गेल्या वर्षी युएईमध्ये आयपीएल यशस्वीपणे झाली होती. या वर्षी त्यांनी एक पाऊल पुढे टाकले आणि भारतातील अनेक शहरात स्पर्धेचे आयोजन केले. या आयोजनातील अनेक गोष्टी पाहिल्यानंतर मी खात्रीने ही गोष्ट सांगू शकतो की अनेक बाबतीत अधिक चांगले करता आले असते. वाचा- सोमवारी कोलकाता नाइट रायर्डस संघातील वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरिअर यांना करोना झाल्याचे वृत्त आले होते. त्यानंतर मंगळवारी हैदराबाद संघातील वृद्धीमान साहा आणि दिल्ली कॅपिटल्समधील अमित मिश्रा यांना देखील लागण झाल्याचे कळाल्यानंतर हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. वाचा- देशात करोना स्थिती बिकट असताना आयपीएलचे आयोजन कशासाठी अशी टीका काही दिवसांपासून होत होती. आम्ही नशिबवान आहोत, सुरक्षित आहोत आणि सर्व काही ठिक आहे. पण बाहेर लोक मुलभूत आरोग्य सेवेसाठी संघर्ष करत आहेत. सर्वजण हा प्रश्न विचारत आहेत की आयपीएल खेळणे गरजेचे होते का? मला वाटते की क्रिकेट गरजेचे होते. सर्वांना असे वाटत होती की यामुळे लोकांना ३-४ तास दिलासा मिळेल. जे मी करू शकतो ते करत आहे. भारत माझ्यासाठी आणि क्रिकेटपटूंसाठी खुप चांगला देश आहे. वाचा- आयपीएल स्थगित झाल्यामुळे आता ऑस्ट्रेलियातील खेळाडूंना मायदेशात जाण्यासाठी मालदीव किंवा श्रीलंकेमार्गे जावे लागले. गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाने १५ मेपर्यंत भारतातून येणाऱ्यांवर बंदी घातली आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3h40ELW
No comments:
Post a Comment