दुबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या संदर्भात एक मोठा निर्णय घेऊ शकते. भारतात नियोजित असलेल्या या वर्ल्डकपमध्ये सहभाग होणाऱ्या संघांची संख्या वाढवण्याचा विचार करत आहे. वाचा- या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात आयसीसी टी-२० वर्ल्डकप होणार आहे. या स्पर्धेतील संघांची संख्या २० करण्याचा आयसीसीचा विचार आहे. सध्या या स्पर्धेत १६ संघांचा समावेश असणार आहे. क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार भारतात होणाऱ्या वर्ल्डकपमधील संघांची संख्या वाढवण्याची शक्यता आहे. आयसीसीने २०२४च्या वर्ल्डकपमधील संघांची संख्या २० करण्याचा विचार केलाय. वाचा- याच बरोबर वनडे वर्ल्डकपमध्ये सहभागी होणाऱ्या संघांची संख्या वाढवण्याचा आयसीसीचा विचार आहे. २०१९च्या वर्ल्डकपमधील संघांची संख्या १४वरून १० करण्यात आली होती. पण आता पुन्हा एकदा ही संख्या १४ करण्याची चर्चा सुरू झाली आहे. वाचा- भारतात ऑक्टोबर-नोब्हेंबर मध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपवर करोनाचे संकट आहे. देशात सध्या करोनाची दुसरी लाट आली असून यामुळे आयपीएलचा १४वा हंगाम स्थगित करावा लागला. आयसीसीने देखील भारतातील करोनाची परिस्थिती सुधारली नाही तर वर्ल्डपक युएईमध्ये आयोजित करण्याची तयारी ठेवली आहे. टी-२० वर्ल्डकपसाठी भारतासाठी पर्याय म्हणून युएईची निवड करण्यात आल्याचे समजते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3w2Ir5S
No comments:
Post a Comment