Ads

Monday, May 10, 2021

विराट-रोहितविना भारताच्या संघाचे कोण करणार नेतृत्व, श्रीलंकेच्या दौऱ्यात काय होऊ शकते पाहा...

नवी दिल्ली : भारतीय संघ जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. पण या दौऱ्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा हे भारतीय संघात नसतील. कारण त्यावेळी विराट आणि रोहित हे दोघेही इंग्लंडच्या दौऱ्याची तयारी करत असतील. त्यामुळे श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाचे नेतृत्व कोणता खेळाडू करणार, याची उत्सुकता सर्वांना लागलेली असेल. भारतापुढे यावेळी रिषभ पंतचा पर्याय असेल. कारण रिषभला आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने यावर्षीच कर्णधारपद दिले होते आणि त्याने चांगले नेतृत्व केल्याचे पाहायला मिळाले होते. आयपीएलच्या पहिल्या २९ सामन्यांचा विचार केला तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ हा अव्वल चार संघांमध्ये सातत्याने होता. त्यामुळे रिषभ पंतला श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी भारताचे कर्णधारपद देण्यात येऊ शकते. लोकेश राहुल हादेखील भारतापुढे चांगला पर्याय असू शकतो. कारण राहुलकडेही नेतृत्वाचा चांगला अनुभव आहे. आयपीएलमध्ये गेल्या दोन वर्षांपासून तो पंजाबच्या संघाचे नेतृत्व करत आहे. त्याचबरोबर भारताच्या संघाचे उपकर्णधारपदही त्याने भुषवले आहे. त्यामुळे लोकेश राहुल हादेखील बीसीसीआयच्या निवड समितीपुढे चांगला पर्याय असू शकतो. जर भारतीय संघाच्या कर्णधारपदी अनुभवी खेळाडू असावा, असे निवड समितीला वाटत असेल, तर त्यांच्यापुढे शिखर धवनचा चांगला पर्याय असेल. कारण शिखरकडे चांगला अनुभव आहे आणि त्याचबरोबर त्याला इंग्लंडला पाठवण्यात येणार नाही. त्यामुळे धवन हा भारतीय संघासाठी चांगला पर्याय असू शकतो. त्याचबरोबर भारताचा स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमारही तोपर्यंत फिट होऊ शकतो आणि त्याच्याकडेही संघाचे कर्णधारपद सोपवण्यात येऊ शकते. त्याचबरोबर श्रेयस अय्यर हादेखील एक चांगला पर्याय भारतीय संघापुढे असू शकतो. करोनाच्या काळात जर जलदगतीने सामने खेळायचे असतील तर प्रत्येक संघाला दोन संघ बनवावे लागणार आहेत. भारतासाठी इंग्लंडचा दौरा सर्वात महत्वाचा असेल. त्यामुळे आपले महत्वाचे खेळाडू भारतीय संघ इंग्लंडला पाठवणार आहे. श्रीलंकेमध्ये मर्यादीत षटकांचे सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी युवा खेळाडूंचा संघ पाठवला जाईल, असे सध्याच्या घडीला दिसत आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/33w3Vfm

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...