नवी दिल्ली: आयपीएलच्या १४व्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळणारा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज लवकरच बाप होणार आहे. याची माहिती कमिंन्सची होणारी पत्नी बेकी बोस्टनने सोशल मीडियावरून दिली. वाचा- बेकी बोस्टनने इस्टाग्राम स्टोरीमध्ये बेबी बंपसह सेल्फी फोटो अपलोड केला आहे. आयपीएलचा १४वा हंगाम स्थिगत झाल्याने पॅट कमिंन्स सध्या परतीच्या वाटेवर आहे. ऑस्ट्रेलिया सरकारने भारतातून येण्यास १५ मे पर्यंत बंदी घातल्याने आयपीएलमध्ये सहभागी झालेले ऑस्ट्रेलियाचे खेळाडू, प्रशिक्षक आणि समालोचक सध्या मालदीवमध्ये आहेत. वाचा-
वाचा- मालदीवमध्ये काही दिवस राहिल्यानंतर आयपीएलमध्ये सहभागी झालेले ४० जण ऑस्ट्रेलियाला रवाना होतील. वाचा-
बेकीने दिलेल्या या गुड न्यूजवर ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार टीम पेनची पत्नी बोन पेन, डेव्हिड वॉर्नरची पत्नी कॅडिस यांनी आनंद व्यक्त केला आहे. पॅट खेळत असलेल्या कोलकाता नाइट रायडर्सने देखील या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. मदर्स डे निमित्ताने काय शानदार बातमी आहे, असे त्यांनी म्हटले आहे. वाचा- आयपीएलच्या १४व्या हंगामात बायो बबलमध्ये खेळाडूंना करोना झाल्याने बीसीसीआयने ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे. या स्पर्धेत सहभागी सर्व परदेशी खेळाडूंना घरी पोहोचवण्याची जबाबदारी बीसीसीआयने घेतली आहे. इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडमधील अनेक खेळाडू मायदेशात पोहोचले आहेत. आता ऑस्ट्रेलियाचे खेळाडू देखील लवकरच घरी पोहोचतील.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3o5BGNH
No comments:
Post a Comment