नवी दिल्ली: व्हायरसचा धोका लक्षात घेऊन आयपीएलचा १४वा हंगाम स्थगित करण्यात आला. या स्पर्धेत सहभागी झालेले अनेक परदेशी खेळाडू मायदेशात जाण्यासाठी रवाना झालेत. यापैकी काही खेळाडू सध्या मालदीवमध्ये असून तेथून ते आपआपल्या देशात जाणार आहेत. वाचा- ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसोबत इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक केव्हिन पीटरसन देखील मालदीवमध्ये आहे. पीटरसन अनेक वेळा हिंदीमध्ये ट्विट करत असतो. यावेळी देखील त्याने हिंदीत ट्विट करून भारतीय चाहत्यांची मने जिंकली आहेत. वाचा- पीटरसनने हिंदीत ट्विट केले असून त्यामध्ये तो म्हणतो, मी भारत सोडला असला तरी सध्या मी अशा एका देशाबाबत विचार करत आहे ज्याने मला भरपूर प्रेम आणि स्नेह दिला. कृपया लोकांनी सुरक्षित रहावे. ही वेळ देखील निघून जाईल. तुम्हाला सावध रहावे लागले. वाचा- आयपीएल स्थगित झाल्यानंतर अनेक विदेशी खेळाडू मालदिवमध्ये गेले आहे. तेथून ते स्वत:च्या मायदेशात जाणार आहेत. पीटरसनने केलेल्या या हिंदी ट्विटवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी पीटरसनचे कौतुक देखील केले आहे. वाचा- मालदीवमध्ये ऑस्ट्रेलियाचे खेळाडू देखील थांबले आहेत. ऑस्ट्रेलियाने भारतातून येणाऱ्या विमानांवर बंदी घातल्याने खेळाडूंना मायदेशात जाता येत नाही. ही बंदी १५ मेपर्यंत आहे. यामुळेच खेळाडू मालदीवमध्ये गेले असून तेथून ते थोड्या दिवसांनी मादेशात जातील. वाचा- आयपीएलच्या १४व्या हंगामातील अद्याप ३१ लढती शिल्लक असून बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या लढतीत भारतात खेळवता येणार नाही असे स्पष्ट केले आहे. या लढतींसाठी बीसीसीआय दुसरा पर्याय शोधत आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3y52Qcc
No comments:
Post a Comment