नवी दिल्ली: भारतातील क्रिकेटची लोकप्रियता किती आहे हे सांगण्याची गरज नाही. फक्त मोठ्या लोकांमध्ये नाही तर लहान मुलांमध्ये देखील क्रिकेटची क्रेझ आहे. आयपीएलचा १४वा हंगाम स्थगित झाल्याने क्रिकेट चाहते थोडे नाराज असले तरी सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. वाचा- व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक आठ वर्षाचा मुलगा फलंदाजी करताना दिसतोय. आता तुम्ही म्हणाल यात एवढे कौतुक कसले. पण हा मुलगा बॅटने नव्हे तर करतोय. नेट्समधील सरावा दरम्यान पॅड आणि हेलमेटसह सिमेंटच्या पिचवर व्यवसाइक क्रिकेटपटू प्रमाणे हा मुलगा फलंदाजी करतोय. तो तीन विकेटपैकी मिडल विकेट घेऊन फलंदाजी करताना दिसतोय. वाचा- वाचा- या व्हिडिओमध्ये संबंधित मुलगा कव्हर ड्राइव्ह, स्ट्रेट ड्राइव्ह, फ्लिक शॉट खेळताना दिसतोय. सोशल मीडियावर या मुलाचे जोरदार कौतुक होत आहे. काहींनी त्याची तुलना भारतीय संघाचा कर्णधार , सुनील गावस्कर यांच्याशी केली आहे. वाचा- संबंधित मुलाचा व्हिडिओ द ग्रेट क्रिकेटरच्या ऑफिशल ट्विटटरवरून शेअर केला गेलाय.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3o1s3zM
No comments:
Post a Comment