Ads

Sunday, May 9, 2021

निमित्त WTC फायनलचे चर्चा IPLची; गांगुली, जय शहा इंग्लंडला जाणार

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव १८ जूनपासून सुरू होणाऱ्या आयसीसी फायनलसाठी इंग्लंडला जाण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यासंदर्भात अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. पण सध्याच्या योजनेनुसार बोर्डाचे अध्यक्ष आणि सचिव WTCच्या फायनलसाठी साउथहँप्टन येथे उपस्थित राहू शकतात. वाचा- वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी गांगुली आणि शहा हे दोघे उपस्थित राहू शकतात. याच बरोबर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डासोबत आयपीएलच्या १४व्या हंगातील उर्वरीत ३१ लढती इंग्लंडमध्ये आयोजित करण्यासंदर्भातील चर्चा होणार आहे. गांगुली आणि शहा यांच्या भेटीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाच्या काही निर्णयांवर देखील इंग्लंड आणि वेल्स बोर्डाशी चर्चा होऊ शकते. वाचा- आयपीएलच्या बायो बबलमध्ये अनेक खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला करोना व्हायरस झाल्याने स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती. इंग्लंडमधील काउंटी क्रिकेटमधील काही संघांनी आयपीएलचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याच बरोबर इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसन याने देखील देशात आयपीएलचे आयोजन व्हावे असे म्हटले होते. वाचा- बेटवे या लेखात पीटरसन म्हणाला होता की, इंग्लंड आणि भारत यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेनंतर थोडा वेळ शिल्लक राहतोय. आयपीएलसाठी भारताचे सर्वोत्तम खेळाडू येथे असतील आणि इंग्लंडचे खेळाडू देखील उपलब्ध असतील. वाचा-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bdzpLb

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...