नवी दिल्ली: आयपीएलच्या १४व्या हंगामात राजस्थान रॉयलकडून खेळणारा युवा जलद गोलंदाज याच्यावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. चेतनच्या वडिलांचे करोनाने निधन जाले आहे. वाचा- आयपीएलचा १४वा हंगाम सुरू असताना चेतनचे वडील कांजीभाई यांना करोना झाल्याचे वृत्त आले होते. कांजीभाई यांना मधुमेह आहे, त्यामुळे चेतनची चिंता आणखीन वाढलेली आहे. चेतनचे वडिल हे टेम्पो चालवून घर चालवत होते. चेतन हा एक गरिब कुटुंबातून आला आहे. आता त्याचे बाबा काम करत नसल्याचे घरची सर्व जबाबदारी चेतनवरच आहे. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सने त्याला आपल्या संघात दाखल करुन घेतले होते. आयपीएलमध्ये चेतनने चमकदार कामगिरी केली होती. आयपीएलचे काही सामने झाल्यावर चेतनला काही प्रमाणात मानधन मिळाले होते. हे मानधन चेतनने आपल्या घरी वडिलांच्या उपचारासाठी जमा केले होते. वाचा- करोना रुग्ण वाढत असल्याने बीसीसीआयने आयपीएल २०२१ स्थगित केली. त्यानंतर चेतन तातडीने घरी घरी पोहोचला खरा आणि तेथून तो थेट रुग्णालयात गेला. सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत तो हॉस्पिटलमध्येच बसून होता. वाचा- आयपीएलपूर्वी चेतन हा बीसीसीआयने आयोजित केलेली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळत होता. त्यावेळी त्याच्या लहान भावाने आत्महत्या केली होती. पण चेतन स्पर्धा खेळत असल्यामुळे त्याला कुटुंबियांनी ही गोष्ट सांगितली नव्हती. ही दुर्देवी घटना कळल्यावर चेतनने आपल्या भावासाठी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्टही लिहिली होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3f3VNYF
No comments:
Post a Comment