Ads

Thursday, May 6, 2021

क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम कॅच; एकाने सोडला तर दुसऱ्याने हुशारीने पकडला

नवी दिल्ली : क्रिकेटच्या मैदानावर फिल्डिंग करताना अनेकदा खेळाडू अफलातून घेतात. नुकत्याच स्थगित करण्यात आलेल्या आयपीएलच्या १४व्या हंगामात देखील असे अफलातून कॅच पाहायला मिळाले. क्रिकेट विश्वात सध्या एका कॅचची चर्चा जोरदार होत आहे. () स्पर्धेत नॉटिंघमशायर संघाच्या दोन खेळाडूंनी अफलातून कॅच घेतला. हा कॅच पाहिल्यानंतर क्रिकेट चाहते आणि माजी क्रिकेटपटू देखील हैराण झाले. सोशल मीडियावर या कॅचचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. वाचा- डरहम ( ) आणि नॉटिंघमशायर () यांच्यातील लढतीमध्ये बेन कॉम्पटन आणि बडिंगर यांनी मिळून एक शानदार कॅच घेतला. ज्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. वाचा- डरहमचा फलंदाज जोनाथन बुशनेलने जॉय एव्हिसनच्या गोलंदाजीवर शॉट मारला. पण चेंडू स्लिपमध्ये गेला. स्लिपमध्ये उभा असलेल्या दोन खेळाडूंनी एकमेकांच्या मदतीने हा कॅच घेतला. स्लिपमध्ये उभ्या असलेल्या एका खेळाडूने कॅच सोडला, पण त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या दुसऱ्या खेळाडूने चेंडू हुशारीने पकडला. जोनाथनने ५८ चेंडूत २८ धावा केल्या. वाचा- ... जोनाथनला बॅटला चेंडूचा स्पर्श झाला आणि चेंडू स्पिपमध्ये गेला. एका क्षणी असे वाटले की खेळाडूने कॅच सोडला आहे. पण दुसऱ्या खेळाडूने चेंडू पकडला आणि जोनाथनला बाद देण्यात आले. या कॅचनंतर नॉटिंघमशायरच्या खेळाडूंनी जल्लोष केला. सोशल मीडियावर देखील या कॅचचे कौतुक होत आहे. नॉटिंघमशायरने कॅचचा व्हिडिओ शेअर केला आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3toVs7Z

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...