Ads

Thursday, May 13, 2021

श्रेयस अय्यरसाठी आनंदाची बातमी, कधी फिट होऊन मैदानात उतरू शकणार पाहा...

नवी दिल्ली : श्रेयस अय्यरला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेमध्ये गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला आयपीएलही खेळता आले नव्हते. पण आता तो या दुखापतीमधून सावरत आहे. त्याचबरोबर तो सप्टेंबरपर्यंत पूर्ण फिट होणार असल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये जर आयपीएल खेळण्यात आली तर तो मैदानात उतरू शकतो, असे दिसत आहे. याबाबत टाइम्स नाऊला सूत्रांनी सांगितले की, " श्रेयस हा दुखापतीमधून सावरत आहे. पण त्यामध्ये थोडा विलंब होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण त्याला दुखापतीमधून सारवण्यासाठी बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये जायला हवे होते. पण सध्याच्या घडीला कर्नाटकमध्ये करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये जात येत नाही. त्यामुळे मुंबईमध्येच श्रेयसवर उपचार सुरु आहेत." भारतामध्ये ऑक्टोबर महिन्यात ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळवण्यात येणार आहे. या विश्वचषकात श्रेयस खेळू शकतो, असे म्हटले जात आहे. कारण श्रेयस जर सप्टेंबर महिन्यात पूर्णपणे फिट झाला तर तो ऑक्टोबरमध्ये नक्कीच मैदानात उतरू शकतो. त्यामुळे या विश्वचषकासाठी श्रेयसची निवड होते की नाही, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. यावेळी सूत्रांनी श्रेयसच्या दुखापतीबाबत सांगितले की, " श्रेयसच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. पण त्याला मैदानात उतरवण्याची घाई करण्यात येणार नाही. त्यामुळे श्रेयस पूर्णपणे फिट झालाय की नाही हे पाहिले जाईल. त्याचबरोबर तो सामना खेळण्यासाठी तयार आहे की नाही, याचीही चाचपणी केली जाईल आणि त्यानंतर त्याला खेळवण्याचा निर्णय घेतला जाईल. कारण ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी तो भारताचा एक महत्वाचा शिलेदार आहे."


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3eLBeS2

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...