Ads

Friday, May 14, 2021

भारतीय संघाला मोठा झटका; इंग्लंड दौऱ्यावर जाणारा खेळाडू पुन्हा करोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली: पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ प्रथम आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या संपूर्ण दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड झाली आहे. संघात निवड झालेला भारताचा विकेटकीपर वृद्धीमान साहा याचा करोना रिपोर्ट पुन्हा एकदा पॉझिटीव्ह आला आहे. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा साहा गेल्या दोन आठवड्यांपासून आयसोलेशनमध्ये आहे. वाचा- आयपीएलच्या १४व्या हंगामात त्याला करोनाची लागण झाली होती. आयसोलेशनमधून बाहेर येण्यासाठी साहाचा करोना रिपोर्ट नेगेटिव्ह आला पाहिजे. साहाला करोनाची कोणताही लक्षणे नाहीत. सुरुवातीला त्याला ताप आला होता. जो आता ठिक आहे. साहाला पुन्हा दिल्लीतच आयसोलेशनमध्ये रहावे लागले. डॉक्टर त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. वाचा- आयपीएलमध्ये जेव्हा साहाला करोनाची लागण झाली होती तेव्हा तो आणि त्याचे कुटुंबीय घाबरले होते. पण वैद्यकीय पथकाने साहाची काळजी घेतल्याने तो आता ठिक झाला आहे. वाचा- इंग्लंड दौऱ्यात ज्या खेळाडूंची निवड झाली आहे. त्यात साहाचा देखील समावेश आहे. जोपर्यंत तो फिट होत नाही तोपर्यंत त्याला भारतीय संघाकडून खेळता येणार नाही. बीसीसीआयने हे आधीच स्पष्ट केले आहे की, इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या खेळाडूंचा करोना रिपोर्ट नेगेटिव्ह आला पाहिजे. इंग्लंडला जाण्याआधी भारतीय खेळाडू मुंबईत येणार आहे. जर मुंबईत आल्यानंतर एखाद्या खेळाडूचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर तो दौऱ्यातून बाहेर होईल. भारतीय खेळाडू इंग्लंडला जाण्याआधी मुंबईत बायो बबलमध्ये राहणार आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3tHID8V

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...