Ads

Saturday, May 15, 2021

अशा परिस्थितीत कमबॅक करणे खुप अवघड असते, गावस्करांनी केले या संघाचे कौतुक

नवी दिल्ली: आयपीएलचा १४वा हंगाम करोना व्हायरसमुळे स्थगित करण्यात आला. बीसीसीआयने ४ मे रोजी ही स्पर्धा स्थगित केली तेव्हा २९ सामने झाले होते. मध्ये अद्याप ३१ लढती शिल्लक आहेत. स्पर्धा स्थगित करण्यात आली होती तेव्हा दिल्ली कॅपिटल्स, , रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि मुंबई इंडियन्स हे संघ पहिल्या चार स्थानावर होते. वाचा- आयपीएलच्या गुणतक्त्यात आघाडीच्या चार संघांपैकी सर्वात प्रभावित कोणी केले असेल तर तो संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज होय, असे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी म्हटले आहे. गुणतक्त्यात भलेही दिल्लीचा संघ आघाडीवर असला तरी सर्वात प्रभावी संघ ना विराटच्या आरसीबीने केले ना रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने तर धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने प्रभावित केले. वाचा- आयपीएल स्थगित झाले तेव्हा चेन्नईच्या संघाने सात पैकी पाच विजय आणि दोन पराभव स्विकारले होते. त्यांचे नेट रनरेट सर्व संघांपेक्षा जास्त होते. गेल्या वर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएलच्या १३व्या हंगामात चेन्नईची कामगिरी अतिशय खराब झाली होती. त्यांना प्ले ऑफमध्ये पोहोचता आले नव्हते. पण या वर्षी त्यांनी शानदार कामगिरी केली. याचे कौतुक गावसक्र यांनी केले. वाचा- चं आयपीएलच्या या हंगामात अनेक संघांनी टॉप कामगिरी केली. पण सीएसकेचा संघ चॅम्पियनसारखा दिसला. या संघाने एक वेगळ्या प्रकारची एनर्जी दाखवली. गेल्या हंगामात खराब कामगिरी केल्यानंतर अशा पद्धतीने कमबॅक करणे अवघड असते. या संघाने अशी कामगिरी करून दाखवली. वाचा- चेन्नई संघाने त्याच्या कोणत्याही मोठ्या स्टार खेळाडूला सोडले नव्हते. पण धोनीचा प्रत्येक डाव योग्य ठरला. त्याने मोइन अलीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले आणि त्याने कमाल केली. रविंद्र जडेजाने शानदार कामगिरी केली. तर सॅम करनने जबरदस्त खेळ केला. फाफ डुप्लेसिसची फलंदाजी देखील शानदार झाली. वाचा-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3eKSs1H

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...