मुंबई: भारतीय कसोटी संघातील फलंदाज सध्या इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळत आहे. विहारी देशात नसला तरी करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लोकांचे होणारे हाल आणि त्यांच्या अडचणींबद्दल तो कमालीचा संवेदनशील आहे. भारतापासून हजारो किलोमीटर लांब असून सुद्धा तो देशातील रुग्णांन मदत करत आहे. वाचा- विहारीने इंटरनेटवर एक ग्रुप तयार केला असून यामध्ये करोना रुग्णांसाठी रुग्णालयात बेड्स उपलब्ध करून दिले जात आहे. तसेच ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे त्यांना सिलेंडर देण्याची व्यवस्था त्याने केली आहे. यासाठी त्याने १०० जणांची एक टीम तयार केली असून हे लोक ज्यांना गरज आहे त्यांना मदत करतात. इतक नव्हे तर करोना रुग्णांच्या भोजनाची व्यवस्था आणि प्लाझ्मा उपलब्ध करून देण्यासाठी विहारी झटत आहे. वाचा- ... भारतातील करोन रुग्णांसाठी देवदूत ठरलेला हा क्रिकेटपटू पुन्हा एकदा चर्चेत आलाय. विहारीने इस्टाग्रामवर एका मुलीला उचारासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याची पोस्ट शेअर केली होती. त्याने ज्यांना शक्य असेल त्यांनी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले होते. वाचा- ले दान विहारीच्या या पोस्टवर एका चाहत्याने. तु स्वत: का मदत करत नाहीस, शेवटी तु एक प्रसिद्ध खेळाडू आहेस, अशी प्रतिक्रिया दिली. चाहत्याच्या या प्रतिक्रियेवर विहारीने सडेतोड उत्तर दिले. तो म्हणाला, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. तुझ्या सारख्या लोकांमुळे भारत सध्या या स्थितीत आहे. खरच लाज वाटते. वाचा-
वाचा- याआधी जेव्हा विहारी भारतातील करोना रुग्णांसाठी मदत करत होता तेव्हा त्याने स्पष्ट केले होते की, मला स्वत:चे कौतुक करायचे नाही. गरजू लोकांना माझ्याकडून थोडीतरी मदत मिळावी, हा माझा उद्देश आहे. त्यासाठीच मी प्रयत्न करतोय. सध्याच्या घडीला भारतामध्ये कठीण काळ आहे आणि त्यावेळी आपण सर्वांनी मदतीचा हात पुढे करायला हवा, असे मला वाटते. करोनाची दुसरी लाट ही घातक असल्याचे दिसत आहे. या परिस्थितीमध्ये लोकांना रुग्णालयात बेड्स मिळत नाहीत. या गोष्टीचा विचारच मी करू शकत नाही. मी माझ्या चाहत्यांच्या आणि मित्रांच्या माध्यमातून गरजू लोकांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3tKcjCB
No comments:
Post a Comment