Ads

Monday, May 10, 2021

कोटींमध्ये कमावणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने करोनासाठी दिली मदत, सोशल मीडियावर झाला ट्रोल

नवी दिल्ली: देशातील वाढत्या करोना संकटाशी लढण्यासाठी अनेक सेलिब्रिटी समोर येत आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि त्याची पत्नी यांनी देखील करोनाविरुद्धच्या लढाईत मदत निधी उभा करण्याचे ठरले आहे. या पती-पत्नीने क्राउड या संस्थेच्या माध्यमातून निधी उभारण्याचा संकल्प केला आहे. या दोघांनी करोनासाठी ३ कोटी रुपयांची मदत दिली आहे. वाचा- विराट आणि अनुष्का यांनी केलेल्या आवाहनानंतर भारतीय संघातील फिरकीपटू याने देखील मदत दिली. पण या मदतीनंतर चहलचे कौतुक होण्यापेक्षा तो सोशल मीडियावर ट्रोल झाला. चहलने करोनाविरुद्धच्या लढात ९५ हजार रुपयांची मदत केली. वाचा- वाचा- चहलने केलेल्या मदतीवर सोशल मीडियावर मात्र वेगळीच प्रतिक्रिया उमटली. भारतीय संघातील मुख्य फिरकीपटूमध्ये समावेश असलेल्या चहलकडून चाहत्यांना मोठ्या मदतीची अपेक्षा होती. त्यामुळेच चाहत्यांकडून त्याला ट्रोल केले जात आहे. लोकांनी चहलचे ९५ हजार म्हणजे गरीबांचे ५० रुपये अशी प्रतिक्रिया दिली आहे. वाचा- विराट आणि अनुष्का यांनी करोनाविरुद्धच्या मदतीसाठी सात कोटी रुपयांचा निधी गोळा करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. भारत सध्या अतिशय अवघड परिस्थितीतून जात आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशाला संकटात टाकले आहे. अशा वेळी आपण एकत्र येण्याची आणि काम करण्याची गरज आहे, असे विराट आणि अनुष्का यांनी म्हटले होते.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bxjw2H

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...