कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. ममता यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली यात एक आशादायक चित्र पाहायला मिळाले. वाचा- राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी एका माजी क्रिकेटपटूला निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. २ मे रोजी झालेल्या निकालात भारतीय क्रिकेट संघाकडून खेळलेला माजी खेळाडू यांनी हावडा जिल्ह्यातील शिवपूर मतदारसंघातून ३२ हजार मतांनी विजय मिळवला. क्रिकेटपटू असलेल्या एखाद्या खेळाडूने आमदार होण्याची ही काही पहिली वेळ नाही. पण मनोज तिवारीने त्यापुढे पाऊल टाकले. वाचा- सोमवारी झालेल्या शपथविधीत मनोज तिवारीने ममता बॅनर्जी सरकारमध्ये क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. एका खेळाडूकडे क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी मिळाल्याने राज्यातील खेळाडूंना चांगल्या सुविधा मिळतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी मनोज तिवारी आणि त्याची पत्नी यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. निवडणुकीत मनोजने जोरदार प्रचार केला होता. आता तो थेट राज्यमंत्री झालाय. वाचा- मनोजने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नेतृत्व केले आहे. त्याने भारताकडून १२ वनडे, ३ टी-२० सामने खेळले आहेत. वनडेत त्याने प्रत्येकी एक शतक आणि अर्धशतक झळकावले आहे. त्याने वनडेत २८७ धावा केल्या असून १०४ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. आयपीएलमध्ये मनोजने ९८ सामने खेळले आहेत. २८.७२च्या सरासरीने त्याने १ हजार ६९५ धावा केल्या. ७५ ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्याने कोलकाता नाइट रायडर्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबकडून सामने खेळले आहेत. वाचा- ... देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने २००६-०७ साली रणजी स्पर्धेत ९९.५०च्या सरासरीने ७९६ धावा केल्या होत्या. मनोजच्या या कामगिरीमुळे त्याला भारतीय संघात स्थान मिळाले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3tD3SIY
No comments:
Post a Comment