बेंगळुरू: भारतीय महिला संघातील क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्तीवर दु:खाचा मोठे डोंगर कोसळले आहे. व्हायरसमुळे वेदाच्या आई आणि बहिणीचे निधन झाले. केवळ दोन आठवड्यात वेदाला आयुष्यातील जवळच्या व्यक्तींना गमवावे लागले. वाचा- वेदाने सोशल मीडियावर आई आणि बहिणीला श्रद्धांजली वाहिली आहे. twitter वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये वेदा म्हणते, हा व्हायरस फार धोकादायक आहे. माझ्या कुटुंबाने सर्व काही ठीक पद्धतीने केले, पण व्हायरसने त्यांना सोडले नाही. मी मनाने त्यांच्यासोबत आहे जे सध्या या परिस्थितीचा सामना करत आहेत. सुरक्षित रहा. वाचा- वाचा- वेदाची आई चेबुवांबा देवी आणि बहिण वत्सला शिवकुमार यांचे दोन आठवड्यांत कोरनामुळे निधन झाले. या दोघाच्या निधनाने माझे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले आहे. मला माहिती नाही की माझे कुटुंब पुन्हा कसे एकत्र होईल. मी फक्त इतक सांगू शकतो की आई आणि बहिणीवर मी खुप प्रेम करते आणि नेहमी त्यांची आठवण येईल. वाचा- भारताकडून वेदाने ४८ वनडे आणि ७६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. देशात करोनाचे रुग्ण आढळल्यापासून वेदा सातत्याने सोशल मीडियावरून लोकांना काळजी घेण्याचे आव्हान करत आहे. वाचा- ... भारताचा क्रिकेटपटू चेतन साकरिया आणि पियुष चावला या दोघांच्या वडिलांचे करोनाने निधन झाले आहे. चेतनचे वडील कांजीभाई यांचे रविवारी करोनामुळे रुग्णालयात निधन झाले होते. तर पियुष चावलाचे वडील प्रमोद कुमार चावला यांचे सोमवरी करोनाने निधन झाले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3o8gE0V
No comments:
Post a Comment