Ads

Thursday, May 13, 2021

पंत भविष्यात मोठा कर्णधार होणार, सुनिल गावस्करांनी केले कौतुक

नवी दिल्ली: करोनामुळे आयपीएलचा १४वा हंगाम स्थगित करण्यात आला. आयपीएल सुरू होण्याआधी दिल्ली कॅपिटल्स ( )चा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाल्यावर ऋषभ पंत()कडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. अनेकांना हा निर्णय पटला नव्हता, कारण संघात अनेक वरिष्ठ खेळाडू होते. जेव्हा स्पर्धा स्थगित झाली तेव्हा पंतने टीकाकारांचे तोंड बंद केले. वाचा- ज्या पद्धतीने पंतने दिल्ली कॅपटिल्सचे नेतृत्व केले आणि संघाला गुणतक्त्यात आघाडीवर ठेवले त्यावरून दिग्गजांनी त्याचे कौतुक केले. स्पर्धा स्थगित झाली तेव्हा दिल्लीचा संघ गुणतक्त्यात अव्वल स्थानी होता. पंतच्या या नेतृत्व गुणाबद्दल सुनील गावस्कर ( ) यांनी कौतुक केले आहे. वाचा- एका वृत्तपत्रात लिहलेल्या लेखात गावस्कर म्हणतात, पंतमध्ये एक करंट दिसतोय जो पुढे जाऊन आग होऊ शकतो. दिल्लीचे नेतृत्व करताना पंतने शानदार कामगिरी केली आहे. सहा सामने होईपर्यंत तुम्ही पाहिले असेल की कर्णधारपदावरून विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देऊन तो थकला होता. प्रत्येक सामन्यानंतर त्याला एकाच पद्धतीचा प्रश्न विचारला जात होता. मला त्याच्यात एक स्पार्क दिसतोय. वाचा- चॅम्पियन? पंतने काही चुका केल्या. पण असा कोणता कर्णधार आहे जो चुका करत नाही. निश्चितपणे पंत भविष्यात एक मोठा कर्णधार होऊ शकतो. त्याने फक्त कर्णधार म्हणून चांगले काम केले नाही तर त्याची फलंदाजी देखील चांगली झाली. ८ सामन्यात त्याने ३५हून अधिकच्या सरासरीने २१३ धावा केल्या. त्याआधी त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शानदार कामगिरी केली होती. वाचा-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3tK42OM

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...