Ads

Thursday, May 13, 2021

करोना लढ्यासाठी विराट-अनुष्काने गोळा केला विक्रमी निधी; ७ कोटींचे टार्गेट, जमा झाले ११ कोटी

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि अभिनेत्री यांनी भारतातील करोन लढ्यासाठी निधी गोळा करण्याचे आव्हान केले होते. या दोघांनी ७ कोटी रुपये गोळा करण्याचे लक्ष्य ठेवले होते. पण निर्धारित वेळेच्या आधी ११ कोटी इतकी रक्कम जमा झाली आहे. वाचा- केटो या संस्थेच्या माध्यमातून विराट आणि अनुष्का यांनी सात कोटी गोळा करण्याचे लक्ष्य ठेवले होते. यात स्वत: विराट आणि अनुष्का यांनी दोन कोटींचा निधी दिला होता. त्यानंतर देश विदेशातील अनेक व्यक्ती आणि संस्थांना यात सहाय्य केले होते. वाचा- या मदत निधीत एमपीएल स्पोटर्स फाउंडेशनने ५ कोटी इतकी रक्कम दिली. त्यामुळे ७ कोटींचे लक्ष्य सहजपणे पार झाले. MPLने दिलेल्या मदतीवर विराटने ट्विट केले आहे. करोना विरुद्धच्या लढाईत पाच कोटीची मदत दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद. यासह या मदत निधीचे लक्ष्य ११ कोटी इतके करण्यात येत आहे. तुम्ही सर्वांनी केलेल्या मदतीसाठी मी आणि अनुष्का आभार व्यक्त करतो. वाचा- विशेष म्हणजे विराट आणि अनुष्का यांनी नव्याने ठेवलेले ११ कोटींचे लक्ष्य देखील पार झाले आहे आणि यासाठी अद्याप एक दिवसाचा वेळ शिल्लक आहे. वॉ वाचा- ... वाचा- विराट प्रमाणेच अन्य भारतीय क्रिकेटपटूंनी करोनाच्या लढ्यात मदत केली आहे. यात सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, पंड्या बंधू आदींचा समावेश आहे. तर ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिंन्स आणि माजी जलद गोलंदाज ब्रेट ली यांनी देखील मदत केली. आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सने ७.५ कोटी, सनरायझर्स हैदराबादने ३० कोटी तर चेन्नई सुपर किंग्जने तामिळनाडू सरकारला ४५० ऑक्सिजन संच दिले आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3w3TlII

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...