Ads

Monday, May 10, 2021

India tour of England 2021 : भारताच्या इंग्लंड दौऱ्याआधी राहुल द्रवीडचे मोठे वक्तव्य, पाहा काय म्हणाला...

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ पुढील काही दिवसात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया प्रथम आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका असेल. या मालिके संदर्भात भारताचा महान क्रिकेटपटू राहुल द्रविड याने एक मोठी भविष्यवाणी केली आहे. वाचा- भारतीय संघाच्या आगामी दौऱ्याबद्दल बोलताना राहुल म्हणाला, टीम इंडिया या वर्षी इंग्लंड दौऱ्यातील पाच सामन्यांची मालिका ३-२च्या फरकाने जिंकले. इतक नव्हे तर भारतीय संघाकडे २००७ नंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची ही सर्वोत्तम संधी असेल. इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकणारा राहुल हा अखेरचा भारतीय कर्णधार होता. वाचा- दौऱ्यावर एका वेबसाइटच्या वेबीनारमध्ये बोलताना राहुल म्हणाला, मला वाटते की भारतीय संघासमोर मालिका जिंकण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख असलेल्या राहुल द्रवीडने या मालिकेत आर अश्विन विरुद्ध बेन स्टोक्स ही लढत पाहण्यासारखी होईल असे देखील सांगितले. इंग्लंडच्या गोलंदाजीबाबत कोणतीही शंका नाही. इंग्लंड जलद गोलंदाजी शानदारच असेल. त्यांच्याकडे अनेक चांगले पर्याय आहेत. वाचा- फलंदाजीबाबत बोलताना राहुल म्हणाला, इंग्लंडचे आघाडीचे सात फलंदाजमध्ये एक जो रूट देखील आहे. त्याच बरोबर ऑलराउंडर बेन स्टोक्स देखील आहे. तो अश्विन विरुद्ध चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. अश्विनने स्टोक्सविरुद्ध भारतात चांगली कामगिरी केली होती आता इंग्लंडमध्ये अशी कामगिरी करण्यात तो उत्सुक असेल. वाचा- इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ चांगल्या पद्धतीने तयार असेल असे देखील राहुल म्हणाला. त्याच्याकडे ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या विजयाचा आत्मविश्वास असेल. खेळाडूंना स्वत:वर विश्वास असेल. संघातील काही खेळाडू इंग्लंडमध्ये या आधी खेळले आहेत. त्यामुळे भारताची फलंदाजी अनुभवी असेल. या कारणांमुळेच भारतासाठी ही सर्वोत्तम संधी असेल आणि ते मालिका ३-२ने जिंकू शकतील.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3oejaTL

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...