मेलबर्न: आयपीएलच्या १४व्या हंगामाला स्थगिती मिळाल्यानंतर खेळाडूंमध्ये सर्वात मोठा फटका बसला तो ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना होय. भारतात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऑस्ट्रेलिया सरकारने भारतातून येण्यावर १५ मेपर्यंत बंदी घातली आहे. अशात आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंना ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघा()ने सुनावले आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टोड ग्रीनबर्न यांनी झाल्यानंतर खेळाडूंना सुनावले आहे. करोनाचा धोका लक्षात घेता येणाऱ्या काळात क्रिकेटपटूंनी सर्व गोष्टींचा योग्य पद्धतीने विचार करावा. परदेशात टी-२० लीगसाठी करार करताना त्याच्याशी संबंधित असलेले धोके समजून घ्यावेत. वाचा- आयपीएलच्या १४व्या हंगामात सहभागी झालेले क्रिकेटपटू, सपोर्ट स्टाफ, समालोचक, प्रशिक्षक आणि सामना अधिकारी असे ४० जण मायदेशात जाण्यासाठी रवाना झाले असून ते भारतातून प्रथम मालदीवला जातील. ग्रीनबर्न म्हणाले, मला विश्वास आहे की भविष्यात कोणत्याही प्रकारचा करार करताना खेळाडूंच्या मनात संकोच असेल. अशा प्रकारचा करार करताना ते थोडा शहानपणा दाखवतील. करोना व्हायरसमुळे आपल्या जगात बरेच बदल होत आहेत. भारतात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. वाचा- आयपीएल खेळण्यास गेलेले अनेक ऑस्ट्रेलियातील सदस्य आता काळजी आणि मानसिक तणावामध्ये असतील. हे खेळाडू जेव्हा देशात परत येतील तेव्हा त्यांची नक्की मदत केली जाईल. येथे ऑस्ट्रेलियात आम्ही मुक्तपणे फिरत आहोत. पण भारतात परिस्थितीत फारच बिघडली आहे. यातून खेळाडूंना एकच मेसेज जातो की, भविष्यात कोणताही निर्णय घेण्याआधी सर्व गोष्टींची योग्य तो विचार करा. वाचा- बीसीसीआयने आयपीएल स्थगित करण्याआधी जोश हेजलवुड, मिचेल मार्श आणि जोश फिलिप यांनी बायो बबलमुळे आलेला थकवा यामुळे स्पर्धेतू माघार घेतली होती. तर एडम झम्पा, केन रिचर्डसन आणि एड्यू टाय यांनी स्पर्धा अर्थ्यावरच सोडून सरकारकडून प्रवासावर बंदी येण्याआधी देश गाठला होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3hbqkGR
No comments:
Post a Comment