Ads

Tuesday, May 4, 2021

IPL 2021 POSTPONED : गूड न्यूज... आयपीएल स्थगितीनंतर हा देश आपल्या खेळाडूंसाठी पुढे सरसावला

नवी दिल्ली : आयपीएलला स्थगिती दिल्यानंतर परदेशी खेळाडूंना सर्वात जास्त समस्या जाणवत आहे. कारण काही खेळाडूंना त्यांच्या देशाने प्रवेश नाकारला आहे. पण सध्याच्या घडीला एक आनंदाची बातमी आली असून एका देशाने आपल्या खेळाडूंसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्याचबरोबर या खेळाडूंना या देशाने मोठी परवानगीही दिली आहे. आयपीएल स्थगित केल्यावर सर्वात जास्त समस्या या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंना होत आहे. कारण ऑस्ट्रेलियाने १५ मेपर्यंत भारताच्या विमानांना आणि प्रवाश्यांसाठी प्रवेशबंदी केली आहे. त्याचबरोबर इंग्लंडनेही भारतातील विमानांसाठी काही अटी घातलेल्या आहेत. त्यामुळे सर्वात मोठा फटका हा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंना बसत आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना मोठा फटका बसत असला तरी दक्षिण आफ्रिका हा देश आपल्या खेळाडूंसाठी पुढे सरसावल्याचे पाहायला मिळत आहे. कारण आपल्या खेळाडूंना देशात प्रवेश देण्याची मोठी परवानगी त्यांनी दिली आहे. त्याचबरोबर या खेळाडूंना क्वारंटाइन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. सध्याच्या घडीला दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाकडून बीसीसीआयबरोबर चर्चा सुरु आहे. आपल्या देशातील खेळाडूंची आबाळ होऊ नये किंवा त्यांना कोणतीही समस्या होऊ नये, असे दक्षिण आफ्रिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे या खेळाडूंना भारतामधून कधी सोडण्यात येईल आणि त्यांची काय व्यवस्था करण्यात येईल, याबाबत त्यांची बीसीसीआयॉबरोबर चर्चा सुरु आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना आता मायदेशीत परतण्यामध्ये कोणतीही समस्या जाणवणार नाही. दक्षिण आफ्रिकेने या परिस्थिती जे सहकार्य दाखवले आहे ते इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे देश कधी दाखवणार, याची चर्चा सध्याच्या घडीला सुरु आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना मायदेशात जाण्यास कोणतीही समस्या सध्याच्या घडीला जाणवताना दिसत नाही. पण त्याचबरोबर अन्य देशांतील खेळाडू मायदेशीत कसे आणि कधी जाणार, याबाबत मात्र प्रश्नचिन्ह कायम आहे. त्यामुळे आता बीसीसीआय या खेळाडूंबाबत नेमका काय निर्णय घेते आणि त्यांना मायदेशी पोहोचवण्यात कशी मदत करते, हे पाहावे लागेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3eVQfzt

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...