Ads

Saturday, May 15, 2021

IND vs NZ WTC Final : टेस्ट चॅम्पियनशिप फायनल, पण कोहलीला टेन्शन अजिंक्य रहाणेचं

मुंबई: करोनामुळे आयपीएलचा १४वा हंगाम स्थगित करण्यात आला. आता भारतीय संघाचे लक्ष पुढील महिन्यात होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलवर आहे. १८ ते २२ जून या काळात इंग्लंडमध्ये न्यूझीलंडविरुद्ध ही लढत होईल. टेस्ट चॅम्पियनशिप आणि इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड झाली आहे. यात सलामीवीर पृथ्वी शॉला संधी मिळाली नाही. तर ऑल राउंडर हार्दिक पंड्या याला देखील स्थान देण्यात आले नाही. भारतीय संघाच्या निवडीवरून बरीच चर्चा होत असली तरी एक असा खेळाडू आहे ज्याच्या संघातील समावेशाबद्दल काळजी व्यक्त केली जात आहे. हा खेळाडू अन्य कोणी नसून भारताचा कसोटी संघाचा उपकर्णधार होय. वाचा- अजिंक्यने आतापर्यंत ७३ कसोटी सामने खेळले असून तो संघाचा उपकर्णधार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जेव्हा विराट मायदेशात परतला होता तेव्हा अजिंक्यच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक विजय भारताने मिळवला होता. असे असेल तरी त्याच्या सध्याच्या फॉर्मवरून न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत विराट कोहली आणि भारतीय संघासाठी तो काळजीचा विषय ठरू शकतो. गेल्या १० कसोटी डावात अजिंक्यने फक्त १९९ धावा केल्या आहेत. यातील त्याची सरासरी २०च्या खाली म्हणजे १९.९० इतकी आहे. या १० पैकी ८ डाव या वर्षी झालेल्या सामन्यातील आहेत. या १० डावात तो ४ वेळा दुहेरी धावसंख्या काढू शकला नाही. वाचा- इंग्लंडमध्ये अजिंक्यची कामगिरी न्यूझीलंडविरुद्धची इंग्लंडमध्ये होणार आहे. जेव्हा अजिंक्यची इंग्लंडमधील कामगिरीवर नजर जाते तेव्हा फार चांगले चित्र दिसत नाही. इंग्लंडमध्ये अजिंक्यने आतापर्यंत २० डावात ५५६ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी २९.२६ इतकी असून त्यात एक शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. या २० डावात तो दोन वेळा शून्यावर बाद झालाय. अजिंक्यच्या इंग्लंडमधील कामगिरीचा थोडा सखोल अभ्यास केल्यास भारतीय संघाची काळजी आणखी वाढते. अजिंक्यने इंग्लंडमध्ये गेल्या १० डावात २५७ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी फक्त २५.७० इतकी आहे. या १० डावात तो ७ वेळा ३० पेक्षा कमी धावसंख्या करून बाद झालाय. इतक नव्हे तर ६ डावात त्याने ५० चेंडू देखील खेळले नाहीत. वाचा- अजिंक्यला अंतिम ११ मधून वगळले जाणार का? या प्रश्नाचे उत्तर निश्चितपणे नाही असेच आहे. भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध सर्वोत्तम ११ खेळाडू मैदानात उतरवेल. अजिंक्यची आतापर्यंतची कसोटीतील कामगिरी आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने मिळवलेला विजय यामुळे अंतिम ११ मध्ये स्थान मिळवण्याची चिंता नसले. पण अजिंक्यला या दौऱ्यात स्वत:ला सिद्ध करून दाखवावे लागले.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/33LKO0Q

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...