Ads

Monday, May 10, 2021

करोनाच्या लढतीत या संघाने दिले ३० कोटी तर CSKने दिले ४५० ऑक्सिजन संच

मुंबई : भारतात करोनाची दुसरी लाट आली असून संपूर्ण देश व्हायरसविरुद्ध लढत आहे. करोनाविरुद्धच्या लढ्यात अनेक जण पुढाकार घेत आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी सात कोटी रुपयांचा निधी गोळा करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. वाचा- .. क्रिकेटमधील अनेक खेळाडू आणि संघांनी करोनाच्या लढतीत मदतीचा हात पुढे केला आहे. देशात सध्या ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. यासाठी महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज()ने तामिळनाडू राज्य सरकारला ४५० ऑक्सिजन संच दान करण्याचा निर्णय घेतला आहे. तर आयपीएलमधील () संघाने रुग्णांसाठी ३० कोटींची मदत जाहीर केली आहे. वाचा- वाचा- वाचा- आयपीएलचा १४वा हंगाम बीसीसीआयने स्थगित केला आहे. स्पर्धा सुरू असताना राजस्थान रॉयल्स संघाने ७.५ कोटींची मदत करण्याचे जाहीर केले होते. संघांसोबत खेळाडूंनी वैयक्तीक मदत देखील देखील केली आहे. यात सचिन तेंडुलकर, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, शेल्डन जॅक्सन, पॅट कमिन्स, ब्रेट ली आणि युझवेंद्र चहल यांनी मदत केली आहे. वाचा- मदत करणारे खेळाडू... सचिन तेंडुलकर- १ कोटी शिखर धवन- ३७ लाख अजिंक्य रहाणे- ३७ लाख शेल्डन जॅक्सन-३७ लाख पॅट कमिन्स-३७ लाख विराट आणि अनुष्का-२ कोटी युझवेंद्र चहल-९५ हजार


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3f4BkDb

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...