तिरुवनंतपूरम: गेल्या वर्षापासून संपूर्ण जग करोना व्हायरसशी लढत आहे. या व्हायरसपासून बचावासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. स्टार असो की उद्योगपती असे अनेक जण मदत करत आहेत. ही मदत किंवा प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्री मदत निधीला दिला जात आहे. अशा मदतीसंदर्भात भारताच्या क्रिकेटपटूने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहली आहे. या पोस्टने त्याने सर्वांचे मन जिंकले आहे. वाचा- निधन भारताचा क्रिकेटपटू एस याने PM किंवा CM मदत निधीत पैसे देण्याआधी विचार करा असा सल्ला दिलाय. अशा मदत निधीत पैसे देण्याबाबत श्रीसंतने वेगळे मत व्यक्त केलय. वाचा- भारताच्या वनडे वर्ल्डकप संघाचा सदस्य असलेल्या श्रीसंतने इस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या मते, सीएम आणि पीएम फंडमध्ये पैसे देण्याआधी त्या लोकांचा विचार करा जे तुमच्या जवळचे आहेत. असे मित्र किंवा नातेवाइक जे आर्थिकदृष्ट्या कमकूवत आहेत. सर्व प्रथम त्यांची मदत करा. कारण त्याच्यापर्यंत सर्वात आधी तुम्ही पोहोचू शकता, पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री नाही. वाचा- वाचा- श्रीसंतने इस्टाग्रामवर शेअर केलेली या पोस्टचे भरपूर कौतुक होत आहे. सर्व जण त्याच्या पोस्टशी सहमत आहेत. करोना व्हायरसमुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर सातत्याने टीका सुरू आहे. देशातील सर्व राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. वाचा- आयपीएलमधील फिक्सिंग प्रकरणात श्रीसंतवर बंदी घालण्यात आली होती. बंदीचा कालावधी गेल्या वर्षी संपला होता. त्यानंतर त्याला केरळच्या रणजी संघात स्थान देण्यात आले होते. आयपीएलच्या १४व्या हंगामासाठी लिलावात सहभागी होण्यासाठी अर्ज केला होता. पण बीसीसीआयने त्याचा लिलावात समावेश केला नाही. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bgiesF
No comments:
Post a Comment