Ads

Monday, May 10, 2021

धोनीच्या एक पाऊल पुढे; फलंदाज क्रीझमध्ये असताना केले बाद, पाहा व्हिडिओ

हरारे : पाकिस्तान संघाने झिम्बाबेविरुद्धची दुसरी कसोटी एक डाव आणि १४७ धावांनी विजय मिळवला. झिम्बावेचा दुसरा डावा २३१ धावात संपुष्ठात आला. या विजयासह पाकिस्तानने २ सामन्यांची कसोटी मालिका २-० अशी जिंकली. कर्णधार बाबर आझम याने पहिल्या चार कसोटी जिंकण्याचा विक्रम केला, अशी कामगिरी करणारा तो पाकिस्तानचा पहिला कर्णधार ठरला. या सामन्यात आबिद अलीने २१५ धावा तर अजहर अलीने १२६ धावा केल्या. वाचा- वाचा- पाकिस्तानकडून नौमान अलीने ९व्या क्रमांकावर येत ९७ धावा केल्या आणि गोलंदाजीत ५ विकेट घेतल्या. अलीच्या कामगिरीचे सर्वजण जसे कौतुक करत आहेत. तसेच तो ज्या पद्धतीने बाद झाला याची देखील चर्चा होत आहे. अलीला शतकासाठी ३ धावा कमी पडल्या. वाचा- वाचा- ट्रोल पाकिस्तानच्या पहिल्या डावात ९७ धावांवर खेळत असताना अलीला झिम्बाब्वेचा विकेटकीपर रेगिस चकाब्वाने त्याला हुशारीने बाद केले. फिरकी गोलंदाज टेंडाई चिसोरोने टाकलेला चेंडू वाइड होता. तो मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या अलीचा प्रयत्न हुकला आणि चेंडू विकेटकीपर हातात गेला. अलीला वाटले आता विकेटकीपर चेंडू गोलंदाजाला परत करेल. त्यामुळे तो बेसावध झाला आणि त्याने क्रीझमध्ये असताना पाय हवेत उचलला. विकेटकीपर चकाब्वाने या संधीचा फायदा घेतला आणि चेंडू विकेटला लावला. वाचा- वाचा- या घटनेचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वजण विकेटकीपरचे कौतुक करत आहेत. वाचा-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3y3N5CC

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...