Ads

Wednesday, May 12, 2021

स्वरा भास्करने केलं पाकिस्तानच्या शोएब अख्तरचं कौतुक, म्हणाली...

नवी दिल्ली : बॉलीवूडची अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या चांगलीच ट्रोल होताना दिसत आहे. कारण स्वराने यावेळी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचे कौतुक केल्याचे समोर आले आहे. भारतातील करोनाच्या पार्श्वभूमीवर शोएबने एक मेसेज सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्याबद्दल स्वराने शोएबचे आभारही मानले आहेत. काही दिवसांपूर्वी शोएबने भारतातील करोनाबाबतच्या परिस्थितीवर भाष्य केले होते. शोएबने भारताची अवस्था बिकट असल्याचे यावेळी सांगितले होते. शोएबने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, " करोनामुळे भारतामध्ये हतबलता निर्माण झाली आहे. भारत सध्याच्या घडीला करोनाशी झुंजत असल्याचे पाहायला मिळत आहे. भारताला जगाच्या पाठिंब्याची गरज आहे. भारतामधील आरोग्य सेवा यंत्रणा क्रॅश झालेली आहे. या कठीण काळात आपण सर्वांनीच एकत्र यायला हवे. या काळात आपण एकमेकांची मदत करायला हवी." स्वराने यावेळी शोएबचे कौतुक केले आहे. स्वराने आपल्या ट्विटर पोस्टमध्ये लिहिले आहे की, " शोएब अख्तर तुमचे आभार. तुम्ही माणुसकीचे दर्शन घडवले. त्यामुळे मी मनापासून तुमचे कौतुक करत आहे." शोएबने व्हिडीओमध्ये नेमकं काय म्हटलं होतं, पाहा...शोएबने ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं होतं की, " सध्याच्या घडीला भारतामध्ये भयंकर अवस्था आहे. महाराष्ट्र, मुंबई, दिल्ली आणि भारताच्या बऱ्याच भागांमधून करोनाचे दिवसाला लाखो रुग्ण सापडत आहे. ही गोष्ट आटोक्यात आणणे कोणत्याही सरकारसाठी शक्य नसल्याचेच सध्याच्या घडीला दिसत आहे. सध्याच्या घडीला भारतामध्ये ऑक्सिजनची सर्वात जास्त गरज आहे. त्यामुळे यावेळी आपण एकमेकांना सहकार्य करायला हवे. मी पाकिस्तानच्या सरकारलादेखील ही गोष्ट सांगणार आहे. त्यामुळे या कठिण प्रसंगामध्ये आपण एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे." आतापर्यंत शोएबला बऱ्याचदा भारतीयांनी ट्रोल केले आहे. पण या कठीण प्रसंगात शोएबला भारताबाबत चिंता वाटत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे भारतामधील लोकांपर्यंत आपल्या भावना पोहोचायला हव्यात, यासाठी शोएबने हा व्हिडीओ बनवल्याचे पाहायला दिसत आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3oaIrxW

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...