मुंबई: भारतीय संघातील युवा पलंदाज () सध्या खांद्याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो आयपीएलचा १४वा हंगाम खेळू शकला नव्हता. श्रेयसवर शस्त्रक्रिया झाली असून आता तो मैदानावर परतण्यास सज्ज झाला आहे. वाचा- इंग्लडविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर पडल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार असलेला श्रेयस अय्यर आयपीएल २०२१ मधून बाहेर झाला. त्यामुळे दिल्लीचे नेतृत्व ऋषभ पंतकडे दिले गेले. अर्थात बायो बबलमध्ये खेळाडूंना करोना झाल्याने आयपीएल स्थगित करण्यात आले. या काळात श्रेयसवर शस्त्रक्रिया झाली आणि आता तो भारतीय संघात कमबॅक करण्यास तयार आहे. वाचा- ... मैदानात परतण्यास कमालीचा उत्सुक असलेल्या श्रेयसने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. तो जर फिट झाला तर जुलै महिन्यात होणाऱ्या श्रीलंका विरुद्धच्या मर्यादित षटकाच्या मालिकेसाठी त्याचा संघात समावेश होऊ शकतो. कदाचित श्रेयसकडे संघाचे नेतृत्व दिले जाण्याची शक्यता आहे. श्रेयसने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओ हा भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील आहे. इस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओत श्रेयस सीमारेषेवर फिल्डिंग करत आहे आणि मागे प्रेक्षक त्याच्या नावाने घोषणा देत आहेत. वाचा- ... हा व्हिडिओ शेअर करताना श्रेयस म्हणतो, मला एक नवा नारा ऐकायला मिळाला. मैदानावर परत येण्यासाठी मी आता वाट पाहू शकत नाही. व्हिडिओमध्ये प्रेक्षक श्रेयसला पाहून एक रुपयाची पेप्सी, अय्यर भाई सेक्सी अशी घोषणा देत आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3vW2oLF
No comments:
Post a Comment