Ads

Wednesday, May 12, 2021

WTC फायनलची तयारी जोरदार; स्वत:ला फिट ठेवण्यासाठी भारतीय खेळाडू पाहा काय करतोय

नवी दिल्ली: करोना संकटामुळे आयपीएलचा १४वा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. यामुळे भारतीय खेळाडूंना इंग्लंडला जाण्याआधी मोठा कालावधी उपलब्ध झाला आहे. पण या काळात स्वत:ला फिट ठेवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. भारताचा विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंतने फिटनेस राखण्यासाठी अनोखा मार्ग निवडला आहे. वाचा- पंतने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो घरातील बागेत गवत कापत असल्याचे दिसते. हा व्हिडिओ शेअर करताना पंत म्हणतो, ये दिल मागे मोवर. सक्तीने क्वारंटाइन ब्रेक, पण घरी असून देखील स्वत:ला फिट ठेवू शकत आहे. यामुळे मी खुस आहे. तुम्ही सर्वजण सुरक्षित रहा. वाचा- भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल साउथहँप्टन येथे १८ ते २२ जून या दरम्यान होणार आहे. या सामन्यानंतर भारत इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. वाचा- ऋषभ पंतने केल्या काही महिन्यात शानदार कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक मालिका विजयात त्याने महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. त्यानंतर मायदेशात इंग्लंडविरुद्ध देखील त्याची कामगिरी चांगली झाली होती. वाचा- शनिवारी पंतने करोना रुग्णांसाठी बेट आणि ऑक्सिजन सिलेंडर आणि करोना किट खरेदी करण्यासाठी हेमकुंट फाउंडेशनला मदत करण्याचे जाहीर केले होते. इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ २ जून रोजी रवाना होतील. त्याआधी भारतीय खेळाडू मुंबईत बाबो बबलमध्ये राहणार आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/33JuA8d

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...