Ads

Thursday, May 13, 2021

क्रिकेटपटूने पाकिस्तान देश सोडला; IPLसाठी तयारी करतोय

नवी दिल्ली: पाकिस्तानचा माजी जलद गोलंदाज मोहम्मद आमीरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता तो लवकरच खेळताना दिसू शकतो. आमीरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर पाकिस्तान देश सोडला आणि इंग्लंडमध्ये स्थायिक झाला आहे. तो तेथील नागरिकत्व घेण्याचा प्रयत्न करत आहे. वाचा- आमीरला इंग्लंडचे नागरिकत्व मिळाले तर तो आयपीएलमध्ये सहभागी होऊ शकतो. आमीरच्या आधी पाकिस्तानचा माजी ऑलराउंडर अजहर महमूदने इंग्लंडची नागरिकत्व घेतल्यानंतर आयपीएल खेळला होता. एका मुलाखतीत म्हणाला, मी आता मोठ्या कालावधीसाठी इंग्लंडमध्ये राहणार आहे. मी येथे क्रिकेटचा आनंद घेत आहे आणि आणखी ६ ते ७ वर्ष खेळण्याची इच्छा आहे. गोष्टी कशा पुढे जातात हे पाहूया. माझी मुले इंग्लंडमध्येच मोठी होतील आणि येथेच शिक्षण देखील घेतील. मी येथे दिर्घ काळासाठी राहणार यात काही शंका नाही, असे तो म्हणाला. वाचा- आमीरने ब्रिटिश नागरिकत्व घेण्यासाठी अर्ज केला आहे. पाकिस्तान सोडल्यानंतर तो परदेशातील लीग स्पर्धेत खेळत आहे. जर त्याला ब्रिटिश नागरिकत्व मिळाले तर तो आयपीएल खेळू शकेल. आमीरने डिसेंबर २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. यासाठी मिस्बाह उल हक आणि वकार युनुस यांना जबाबदार ठरवले होते. वयाच्या २८व्या वर्षी निवृत्ती घेऊन आमीरने सर्वांना धक्का दिला होता. वाचा- आयपीएल खेळणार का? आयपीएल खेळणार का या प्रश्नावर आमीर म्हणाला, भविष्याबद्दल मी अद्याप विचार करत नाही. एकदा मला नागरिकत्व मिळाले तर गोष्टी बदलून जातील. संघात योग्य सम्मान दिला जात नसल्याचे आमीरने म्हटले होते. पाकिस्तानकडून क्रिकेट न खेळणे हा खुप अवघड निर्णय होता. पण दुसरा कोणताच पर्याय देखील नव्हता. आमीरने पाकिस्ताकडून ३६ कसोटीत ११९ विकेट, ६१ वनडेत ८१ तर ५० टी-२० मध्ये ५९ विकेट घेतल्या आहेत. वाचा-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3tEE7bf

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...