Ads

Friday, May 7, 2021

IND vs ENG : भारतीय संघाची लॉटरी लागलेला अरझान नागवासवाला नेमका आहे तरी कोण, जाणून घ्या...

नवी दिल्ली : भारतीय संघाची जेव्हा इंग्लंडच्या दौऱ्यासाठी आणि विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली, तेव्हा सर्वांनाच एक नाव वाचून मोठा धक्का बसला. हे नाव होतं अरझान नागवासवाला. कारण आयपीएलमध्येही हे नावं कोणाच्या कानावर आलं नव्हतं. त्याचबरोबर स्थानिक स्पर्धेतही या खेळाडूचे नाव चर्चेत आले नव्हते. पण या खेळाडूला चक्क भारतीय संघाची लॉटरी लागलेली आहे. या अरझानने आतापर्यंत नेमकी काय कामगिरी केली आहे, पाहा... अरझान नागवासवाला हा गुजरातचा खेळाडू आहे. सुरतमध्ये १९९७ साली त्याचा जन्म झाला. आतापर्यंत गुजरातच्या संघाबरोबरच त्याने काही स्थानिक सामने खेळले आहे. अरझान हा डावखुरा गोलंदाज आहे, त्याचबरोबर तो उपयुक्त फलंदाजीही करतो. आतापर्यंत १६ प्रथम श्रेणी सामने तो खेळलेला आहे. या १६ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने ६२ बळी मिळवल्या आहेत, त्याचबरोबर ४७ धावाही त्याच्या नावावर आहे. अरझानने आतापर्यंत १५ ट्वेन्टी-२० सामन्यांमध्येही गुजरातचे प्रतिनिधीत्व केले आहे. या १५ ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये अरझानने २१ बळी मिळवले आहेत, तर त्याच्या नावावर २४ धावा जमा आहेत. त्याचबरोबर लिस्ट-ए सामन्यांमध्येही त्याने गुजरातचे प्रतिनिधीत्व केले आहे. फक्त या कामगिरीच्या जोरावरच त्याची संघात निवड झाली आहे. भारतीय संघात सरावासाठी खास चार गोलंदाजांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये अरझानचा समावेश करण्यात आला आहे. अरझानबरोबर प्रसिध कृष्णन, अभिमन्यू इश्वरन, आव्हेश खान हेदेखील भारतीय संघाबरोबर नेट बॉलर म्हणून जाणार आहेत. आतापर्यंत गुजरातकडून खेळताना अरझानला नेत्रदीपक अशी कामगिरी करता आलेली नाही, त्याचबरोबर तो कधीही चांगल्या कामगिरीमुळे प्रकाशझोतात आलेला नाही. त्याचबरोबर आयपीएलमध्येही अरझान कोणाला दिसला नव्हता. त्यामुळे अरझानची निवड भारतीय संघात कशी करण्यात आली आहे, हा प्रश्न काही चाहत्यांना पडलेला आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला भारताच्या क्रिकेट वर्तुळामध्ये अरझानच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. अरझानला आता भारताच्या संघात संधी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3uvuA7H

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...