Ads

Saturday, May 15, 2021

'दयावान' भारतीय खेळाडू; ९० हजार कुटुंबीयांना मोफत अन्नधान्य दिल्यानंतर उत्पन्न केले दान

नवी दिल्ली: भारतात आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून रोज ३ लाख नवे रुग्ण देशात सापडत आहेत. देशातील वैद्यकीय यंत्रणाच्या मदतीसोबतच गरजू लोकांना अनेक जण मदतीचा हात पुढे करत आहेत. वाचा- भारताचा माजी क्रिकेटपटू हा देखील करोनाच्या या संकट काळात लोकांच्या मदतीला धावून आला आहे. इरफान आणि त्याचा भाऊ युसुफ करोना रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोफत अन्न धान्याचे वाटप करत आहेत. वाचा- गेल्या वर्षापासून पठाण बंधू करोना झालेल्या रुग्णाच्या कुटुंबांना तसेच अन्य गरजू लोकांना अन्न धान्य पुरवठा करत आहेत. आतापर्यंत त्यांनी ९० हजार कुटुंबीयांना महिन्याचे रेशन मोफत दिले आहे. आता पुन्हा एकदा पठाण बंधूंनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. इरफानने सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळणारे सर्व उत्पन्न दान करण्याचा निर्णय घेतला आहे. वाचा- इरफान आणि युसुफ यांनी वडिलांच्या नावाने सुरू केलेल्या संस्थेच्या माध्यमातून वडोदरा येथे करोना रुग्ण आणि कुटुंबीयांना मोफत अन्न तर क्रिकेट अकादमी ऑफ पठान्सच्या माध्यमातून दक्षिण दिल्लीत करोना रुग्ण आणि कुटुंबियांना मोफत जेवण देण्यास सुरुवात केली आहे. त्याच बरोबर विविध रुग्णालयात PPE किट्स आणि मास्कचे वाटप, व्हिटॅमिन सी च्या गोळ्या अशी मदत हे दोघे करत आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3hoHSiJ

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...