Ads

Saturday, November 14, 2020

IND vs AUS: या भारतीय खेळाडूमुळे पहिल्या कसोटी सामन्याच्या तिकिटांची मागणी वाढली

नवी दिल्ली: भारताचा क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी दाखल झाला आहे. या दौऱ्याची सुरूवात वनडे मालिकेपासून होणार आहे. त्यानंतर टी-२० आणि मग चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. यातील पहिला कसोटी सामना १७ डिसेंबर रोजी ओव्हल मैदानावर होणार आहे. या सामन्याच्या तिकिटांची मागणी अचानक वाढली आहे. ही मागणी वाढण्याचे कारण भारतीय खेळाडू आहे. वाचा- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिला कसोटी सामना डे-नाइट असणार आहे. एका भारतीय खेळाडूमुळे या सामन्याच्या तिकिटांची मागणी वाढली आहे. भारताचा कर्णधार विराट कोहील ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील फक्त पहिला कसोटी सामना खेळणार आहे. त्यानंतर तो मुलाच्या जन्मासाठी पत्नी अनुष्कासाठी भारतात येणार आहे. वाचा- विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील फक्त एकच कसोटी मालिका खेळणार आहे. यामुळेच या सामन्याच्या तिकीटांची मागणी वाढली आहे. मेलबर्न येथील अंगद सिंह ओबेरॉय हे भारतीय संघाला पाठिंबा देणारा स्वामी ग्रुप चालवतात. ते या सामन्याची तिकीटे उपलब्ध करुन देत असतात. ग्रुपमध्ये पहिल्या सामन्याची तिकीटांची मागणी वाढल्याचे ते म्हणाले. वाचा- सिडनी मॉर्निंग हेराल्डशी बोलताना ते म्हणाले, डे नाइट सामन्याबद्दल उत्सुकता असते. आमच्याकडे तिकिटांची मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. पहिला कसोटी सामना पाहण्यासाठी २५ हजार हून अधिक लोक येण्याची शक्यता आहे. या सामन्यात २७ हजार प्रेक्षकांना येण्याची परवानगी दिली आहे. वाचा- असा आहे वनडे मालिका १) पहिली वनडे- २७ नोव्हेंबर, सिडनी २) दुसरी वनडे- २९ नोव्हेंबर, सिडनी ३) तिसरी वनडे- २ डिसेंबर, मानकुआ ओव्हल टी-२० मालिका १) पहिली टी-२०: ४ डिसेंबर, मानकुआ ओव्हल २) दुसरी टी-२०: ६ डिसेंबर, सिडनी ३) तिसरी टी-२०: ८ डिसेंबर, सिडनी सराव लढती ६ ते ८ डिसेंबर- सराव सामना, ड्रमोनी ओव्हल, सिडन ११-१३ डिसेंबर- सराव सामना (डे-नाइड), सिडनी कसोटी मालिका १) पहिली कसोटी- १७ ते २१ डिसेंबर, एडिलेड ओव्हल २) दुसरी कसोटी- २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न ३) तिसरी कसोटी- ७ ते ११ जानेवारी २०२१, सिडनी ४) चौथी कसोटी- १५ ते १९ जानेवारी, २०२१, गाबा


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2K2jHYB

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...