नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने गुरुवार १९ नोव्हेंबरपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक नवा नियम लागू केला आहे. या नव्या नियमानुसार आयसीसीने खेळाडूंसाठी वयोमर्यादा निश्चित केली आहे. किमान वयोमर्यादेच्या नियमामुळे पाकिस्तानच्या एका माजी खेळाडूचा विक्रम आता कायम स्वरुपी राहणार आहे. तो नियम भविष्यात देखील मोडला जाण्याची शक्यता नाही. वाचा- आयसीसीने गेल्या आठवड्यात किमान वयोमर्यादेचा नियम तयार केला. या नुसार अशाच खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी दिली जाईल ज्यांचे वय किमान १५ वर्ष असेल. आयसीसीने खेळाडूंच्या सुरक्षेचा विचार करून हा नियम लागू केला आहे. हा नियम आयसीसीच्या सर्व स्पर्धा, द्विपक्षिय मालिका, १९ वर्षाखालील क्रिकेटसह सर्व क्रिकेट स्पर्धांना लागू होणार आहे. तसेच हा नियम पुरुष आणि महिला या दोन्ही क्रिकेटपटूंना लागू होणार आहे. याचा अर्थ ज्या खेळाडूंचे वय १५ वर्ष आहे त्यांनाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता येईल. वाचा- अर्थात असाधारण परिस्थितीत संबंधित देशाचे बोर्ड १५ वर्षपेक्षा कमी वय असेलल्या खेळाडूला खेळवण्यासाठी आयसीसीकडे विनंती करू शकते. त्यानंतर संबंधित खेळाडूचा अनुभव, मानसिक विकास आणि आंतरराष्ट्रीय मापदंड याचा चाचणी घेऊन त्याला खेळण्याची संधी देऊ शकते. पण आयसीसीने हा नियम बदलल्यामुळे पाकिस्तानचा माजी खेळाडू याचा विक्रम आता कायम स्वरुप राहणार आहे. वाचा- ता सर्व साधारण विक्रम हे मोडण्यासाठी तयार होतात. पण पाकिस्तानचा माजी फलंदाज हसन रजा यांचा सर्वात कमी वयात कसोटी खेळण्याचा विक्रम मोडला जाणार नाही. हसन रजा यांनी २४ ऑक्टोबर १९९६ रोजी १४ वर्ष आणि २२७व्या दिवशी झिम्बब्वेविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते. आयसीसीच्या या नव्या नियमाचे हसन रजा यांनी देखील स्वागत केले आहे. वाचा- मी या निर्णयाचे यासाठी स्वागत करत नाही की, माझा विक्रम कायम राहणार आहे. तर १५ वर्षानंतर खेळाडू मानसिकरीत्या मजबूत होतो आणि खेळाडूच्या सुरक्षेच्या दृष्टीने देखील ही गोष्ट महत्त्वाची आहे असे, रजा म्हणाले. वाचा- हसन रजा जेव्हा खेळायचे तेव्हा वेस्ट इंडिजकडून कर्टनी वॉल्श सारखे वेगवान गोलंदाज होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/33roLwP
No comments:
Post a Comment