नवी दिल्ली: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचा वनडे मालिकेत पराभव झालाय. काल रविवारी सिडनी मैदानावर झालेल्या दुसऱ्या वनडे मालिकेत भारताचा ५१ धावांनी पराभव झाला आणि ऑस्ट्रेलियाने मालिका २-०ने जिंकली. लढत म्हटल्यानंतर जय-पराभव होणारच. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभवामुळे टीम इंडियाचा पराभव आता नित्याचा झाला आहे की काय असे वाटू लागले आहे. वाचा- भारतीय संघाने गेल्या सात आंतरराष्ट्रीय सामन्यापैकी एकाही सामन्यात विजय मिळवलेला नाही. यातील धक्कादायकबाब म्हणजे या सातही सामन्यात भारतीय संघात नव्हता. हा योगायोग देखील असू शकतो किंवा रोहित शर्माचा प्रभाव, पण एक गोष्टी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन पराभवाने समोर आले आहे आणि ती म्हणजे रोहित शिवाय भारतीय संघ पूर्णच होऊ शकत नाही. वाचा- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन्ही लढतीत भारतीय संघाला मोठी धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. या दोन्ही लढतीत भारताला चांगली सुरूवात मिळाली नाही. ज्यामुळे सामना आणि मालिका दोन्ही गमावल्या. रोहित शर्माने फेब्रुवारी महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध अखेरची आंतरराष्ट्रीय मॅच खेळली होती. त्याने न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मॅच खेळली होती. न्यूझीलंडविरुद्ध दुखापत झाल्यानंतर तो खेळू शकला नाही. भारतीय संघ रोहित शर्माशिवाय खेळू लागला आणि त्यानंतर एकाही सामन्यात विजय मिळवता आला नाही. रोहित नसताना भारताचा आधी न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेत ३-० असा पराभव झाला. त्यानंतर दोन कसोटी सामन्यांची मालिका देखील २-०ने अशी गमावली. न्यूझीलंडनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका करोनामुळे रद्द झाली. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका भारताने गमावली. रोहित शिवाय मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला विजय देखील मिळत नाही हेच या आकडेवारीवरून सिद्ध होतय. वाचा- ३ मालिका आणि ७ सामने गमावले रोहित शर्मा भारतीय संघात नसताना ३ मालिका आणि सात सामन्यात टीम इंडियाचा पराभव झालाय. यात ५ वनडे आणि दोन कसोटी मालिकांचा समावेश आहे. रोहित शर्माचा भारतीय संघाला दोन प्रकारे उपयोग होतो. एक तर तो उपकर्णधार आहे आणि अनुभवी असल्यामुळे गोलंदाजांसोबत चर्चा करत असतो. त्याच बरोबर सलामीवीर म्हणून संघाला चांगली सुरूवात करून देतो.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37fvefc
No comments:
Post a Comment