Ads

Saturday, November 14, 2020

आयपीएल २०२१ साठी धोनी नव्हे हा असेल CSKचा कर्णधार; माजी प्रशिक्षकाचे वक्तव्य

नवी दिल्ली: भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर धोनी आयपीएलच्या १३व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जच्या यलो जर्सीमध्ये दिसला. पण या वर्षी चेन्नईची कामगिरी आजवरची सर्वात खराब झाली. नेहमी प्ले ऑफमध्ये जाणाऱ्या चेन्नईला या वर्षी गुणतक्त्यात सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. चेन्नई सुपर किंग्जने स्पर्धेच्या अखेरीस पुढील वर्षाची तयारी करत असल्याचे सांगितले होते. खुद्ध धोनीने कोअर टीममध्ये बदल करण्याची गरज असल्याचे म्हटले होते. आता धोनी चेन्नईचे नेतृत्व करणार नाही असे विधान एका माजी क्रिकेटपटूने केले आहे. वाचा- धोनीने चेन्नई सुपर किंग्जला आयपीएलची तीन विजेतेपद मिळवून दिली आहेत. मुंबई इंडियन्सच्या पाच विजेतेपदानंतर ही सर्वाधिक विजेतेपद आहेत. पम या वर्षी धोनीला काही कमाल करता आली नाही. त्यामुळेच तो धोनी चेन्नईचे कर्णधारपद सोडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच भारतीय संघाचे फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर यांनी धोनीच्या कर्णधारपदाबद्दल वक्तव्य केले आहे. वाचा- बांगर यांच्या मते धोनी पुढील वर्षी आयपीएलमध्ये चेन्नई संघाचे नेतृत्व करणार नाही. तो संघात एक खेळाडू म्हणून असेल. या वर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत चेन्नईची कामगिरी अतिशय खराब झाली. स्वत: धोनीची कामगिरी समाधानकारक नव्हती. १४ सामन्यात त्याने फक्त २०० धावा केल्या. ज्यात एकही अर्धशतक नव्हते. वाचा- धोनीने २०११ नंतर भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडले होते. पण त्यानंतर तो संघाच्या मदतीला नेहमी धावून येत होता. तेव्हा देखील भारतीय संघात कोणताही खेळाडू कर्णधारपदासाठी तयार नव्हता असे बांगर म्हणाले. धोनीने योग्य वेळी संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे सोपवले. अशाच पद्धतीने धोनी पुढील वर्षी चेन्नईचे नेतृत्व अन्य कोणाकडे तरी सोपवेल आणि एक खेळाडूची भूमिका पार पाडले. चेन्नईचे नेतृत्व फाफ डु प्लेसिसकडे जाऊ शकते. वाचा- आयपीएलमधील अखेरच्या साखळी सामन्यात जेव्हा त्याला विचारण्यात आले की हा तुझा अखेरचा सामना आहे का? त्यावर धोनीने निश्चिपणे नाही असे उत्तर दिले होते. बांगर म्हणाले, चेन्नईकडे कर्णधारपदासाठी फार पर्याय नाहीत. अन्य संघ लिलावात अशा खेळाडूला रिलीज करणार नाही ज्याच्याकडे चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करण्याची क्षमता असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2IzYrsY

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...