नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार () चे मेन्टॉर () यांचे वयाच्या ७३व्या वर्षी निधन झाले. मंगळवारी २४ नोव्हेंबर रोजी रांची येथील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देवल हे बिहार क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष होते. गेल्या तीन महिन्यांपासून ते आजारी होते. वाचा- देवल सहाय यांना रांची क्रिकेटचे भीष्म पितामह म्हटले जात असे. ते स्वत: क्रिकेटपटू आणि फुटबॉलपटू होते. सहाय हे सेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेडच्या निर्देशकपदावरून निवृत्त झाले. २००६ नंतर त्यांनी क्रीडा प्रशासनातून स्वत:ला वेगळे केले. त्याच्या निधनावर झारखंड राज्य क्रिकेट संघटना आणि अन्य संघटना तसेच क्रिकेट प्रेमींनी शोक व्यक्त केला. वाचा- प्लॅन वाचा- १९९७-९८ साली सेंट्रल कोलफील्ड लिमिडेटचे चेअरमन असताना देवल सहाय यांनी धोनीला स्टायपेंडवर ठेवले होते. त्यांनी धोनीला १९९७-९८ या काळात स्टायपेंडवर ठेवले होते. धोनीने क्रिकेट विश्वात गाठलेली उंची मागे सहाय यांची महत्त्वाची भूमिका होती. वाचा- एमएस धोनीवरील चित्रपटात देवल सहाय यांचा उल्लेख केला गेला आहे. सेलमध्ये धोनीची वडील काम करत होते. धोनीला कंपनीत घेतल्यानंतर त्याच्यासाठी त्यांनी टर्फ पिच तयार केली. त्यानंतर जेव्हा ते सीसीएलमध्ये गेले तेव्हा तेथे देखील त्यांनी टर्फ पिच तयार केली. जेव्हा सीसीएलकडून क्रिकेट खेळू लागला तेव्हा त्याचा गेम वेगळ्या उंचीवर गेला. त्यांनी धोनीसह अनेक खेळाडूंचे मेन्टॉर म्हणून काम केले. धोनी शिवाय त्यांनी देश आणि राज्य क्रिकेटला अनेक चांगले खेळाडू दिले. यात प्रदीप खन्ना, आदिल हुसैन, अनवर मुस्तफा, धनंजय सिंह, सुब्रत दा, संजीव सिन्हा, राजीव कुमार राजा, सरफराज अहमद यांचा समावेश आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3l06Yma
No comments:
Post a Comment