सिडनी : भारतीय संघ सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. पण भारताचा कर्णधार विराट कोहलीपुढे सध्याच्या घडीला एक मोठा प्रश्न पडला आहे. तो प्रश्न म्हणजे शिखर धवनबरोबर सलामीला नेमकं कोणाला पाठवायचं, या प्रश्नाचे उत्तर लवकरच कोहली आणि संघ व्यवस्थापनाला शोधावे लागणार आहे. शिखर धवनबरोबर सलामीला येण्यासाठी कोहलीपुढे दोन पर्याय ठेवण्यात आले आहेत. धवनबरोबर मयांक अगरवाल आणि शुभमन गिल या दोघांपैकी एका खेळाडूला सलामीला पाठवले जाऊ शकते, पण या दोघांपैकी नेमकी कोणाची निवड करायची, हा प्रश्न कोहलीला सोडवावा लागणार आहे. कारण मयांकने आयपीएलमध्ये धडाकेबाज फलंदाजी केली होती, पण त्याचबरोबर गिलनेही या आयपीएलमध्ये दमदार सलामी दिली होती. त्यामुळे गिल की अगरवाल हा तिढा कोहली आणि संघ व्यवस्थापनाला सोडवावा लागणार आहे. कसा होणार निर्णय पाहा...धवनबरोबर मयांक अगरवाल आणि शुभमन गिल यांच्यापैकी कोण सलामीला जाणार, हा प्रश्न काही गोष्ट पाहून सोडवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या नेमक्या कशा आहेत, हे पहिल्यांदा पाहिले जाईल. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या संघात कोणत्या गोलंदाजांना संधी दिली गेली आहे, याचाही विचार केला जाईल. या दोन गोष्टींच्या आधारे धवनबरोबर मयांक अगरवाल आणि शुभमन गिल यांच्यापैकी कोण सलामीला येणार, हे भारतीय संघ ठरवणार आहे. रोहित आणि इशांत या दोघांचा कसोटी मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. हे दोन्ही खेळाडू सध्या बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिट होण्यासाठी मेहनत घेत आहेत. अशातच भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रोहित आणि इशांत यांना स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. जर हे दोन खेळाडू आठवड्याभरात ऑस्ट्रेलियात दाखल झाले नाही तर त्यांचे कसोटी मालिका खेळणे अवघड होईल. ऑस्ट्रेलियातील नियमानुसार १४ दिवसांचा क्वारंटाइन आवश्यक आहे. दोन्ही संघातील पहिली कसोटी १७ डिसेंबर रोजी होणार आहे. तर ११ डिसेंबरपासून सराव सामने होणार आहेत. जर १० डिसेंबरपर्यंत क्वारंटाइनमधून बाहेर यायचे असेल तर या दोघांना २६ नोव्हेंबरपर्यंत ऑस्ट्रेलियात यावे लागेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3m0tvRg
No comments:
Post a Comment