Ads

Monday, November 30, 2020

भारताचा पराभव झाला कारण नेतृत्व खराब होते; विराटवर सडकून टीका

नवी दिल्ली: ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्याच मालिकेत भारताचा पराभव झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीवर जोरदार टीका सुरू झाली आहे. भारताचा माजी सलामीवीर याने वनडे मालिकेत २-०ने झालेल्या पराभवानंतर विराटच्या खराब नेतृत्वावर टीका केली. वाचा- विराटचे नेतृत्व समजण्यापलिकडे आहे. दुसऱ्या वनडेत पॉवरप्ले मध्ये जसप्रीत बुमराहला फक्त दोन ओव्हर दिल्या. जेव्हा आपण विकेट घेण्याच्या गोष्टी करतो तेव्हा मुख्य गोलंदाजाला अधिक संधी दिली पाहिजे. जर ती दिली गेली नाही तर विकेट कशा मिळतील, असे गंभीर म्हणाला. वाचा- ऑस्ट्रेलियाविरुद्धची पहिली वनडे गमवल्यानंतर भारताला मालिकेतील अस्थित्व टीकवण्यासाठी दुसऱ्या वनडेत विजय मिळवणे गरजेचा होता. पण पहिल्या लढती प्रमाणे दुसऱ्या लढतीत भारताचा दारुण पराभव झाला. दुसऱ्या पराभवानंतर गंभीर म्हणाला, चेंडू नवा असताना विराटने जसप्रीत बुमराहला फक्त दोन ओव्हर का दिल्या? अगदी प्रामाणीकपणे सांगायचे तर विराटची नेतृत्वशैली समजण्यापलिकडची आहे. सामन्यात विजय मिळवण्यासाठी अधिक विकेट घेऊन ऑस्ट्रेलियाची बॅटिग लाइन अप तोडण्याची गरज आहे. पण तुम्ही महत्त्वाच्या गोलंदाजाला फक्त दोन ओव्हरच दिल्या. सामान्यपणे वनडेत ४-३-३ ओव्हरची स्पेल असते. ३ ओव्हरची स्पेल सर्वोत्तम मानली जाते. वाचा- चेंडू नवा असताना मुख्य जलद गोलंदाजाला फक्त दोन ओव्हर दिल्या जातात, अशा प्रकारची शैली माझ्या समजण्याच्या पलिकडे आहे. ही काही टी-२० लढत नाही. भारताचा पराभव झाला कारण खराब नेतृत्व झाले. दोन्ही वनडेत भारताचे गोलंदाज छोटे-छोटे स्पेल टाकत होते आणि गोलंदाज वेगाने बदलले जात होते, असे गंभीर म्हणाला. वाचा- संघ निवडीवर प्रश्न गंभीरने संघ निवडीवर देखील प्रश्न उपस्थित केले. दुसऱ्या वडेत वॉशिंग्टन सुंदर किंवा शिवम दुबे यांना संधी देता आली असती. या सामन्यात त्यांची कामगिरी कशी होते हे पाहता आले असते. या दोघांपैकी एकाहीची निवड केली नाही याचा अर्थ तुम्ही संघ चुकीचा निवडला आहे. जोपर्यंत तुम्ही अंतिम ११ मध्ये संधी देणार नाही तोपर्यंत तो खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कशी कामगिरी करतो हे कसे कळणार. वाचा- दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाने ५० षटकात ४ बाद ३८९ धावा केल्या. उत्तरादाखल भारताला ९ बाद ३३८ धावा करता आल्या. भारताने हा सामना ५१ धावांनी गमावला आणि मालिका देखील २-० अशी गमावली.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2HQTzzf

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...