मुंबई : सध्याच्या घडीला सर्वांचेच लक्ष रोहित शर्माच्य फिटनेस टेस्टकडे लागलेले आहे. कारण जोपर्यंत रोहित ही टेस्ट पास होत नाही, तोपर्यंत त्याला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाता येणार नाही. बीसीसीआयमधील एका सूत्रांनी रोहित शर्माची फिटनेस टेस्ट नेमकी कधी होणार, याची तारीख सांगितली आहे. रोहित सध्याच्या घडीला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे. तिथे तो आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रीत करत आहे. पण बीसीसीआयचे फिजिओ रोहितची फिटनेस टेस्ट घेणार आहे. ही फिटनेस टेस्ट ११ डिसेंबरला होणार असल्याचे बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितले आहे. पण रोहित या फिटनेस टेस्टमध्ये पास झाला तरी काही मोठ्या समस्या येऊ शकतात, असे म्हटले जात आहे. रोहितची फिनेस टेस्ट ११ डिसेंबला झाली की तो १२ डिसेंबरला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यााठी रवाना होऊ शकतो. पण ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यावर रोहितची करोना चाचणी होणार आहे. या चाचणीमध्ये रोहित निगेटीव्ह सापडला तर त्याला भारतीय संघाबरोबर राहता येणार आहे. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रोहितला १४ दिवस त्यानंतर क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला १७ डिसेंबरला सुरुवात होणार आहे. त्यामुळे रोहित जर १४ दिवस क्वारंटाइन राहणार असेल, तर त्याला दोन कसोटी सामन्यांना मुकावे लागणार आहे. त्यामुळे आता रोहितबाबतचा निर्णय नेमका काय घ्यायचा, याचा विचार बीसीसीआय करत आहे. कारण रोहितला पाठवायला स्पेशल विमान बुक करावे लागणार आहे. त्याचबरोबर एवढा खर्च करून रोहित फक्त दोनच कसोटी सामने खेळणार असेल तर आपण हा खर्च करायचा की नाही, याचा विचार बीसीसीआय करत आहे. त्याचबरोबर हा प्रश्न कसा सोडवता येईल, याबाबत बीसीसीआय प्रयत्न करत आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, " बीसीसीआय ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाच्या सातत्याने संपर्कात आहे. रोहित आणि इशांत यांचा क्वारंटाइनचा कालावधी कमी केला तर हे दोघेही सराव सामन्यातही सहभागी होऊ शकतात. त्यासाठी बीसीसीआय ऑस्ट्रेलियाच्या सरकारबरोबरही संवाद साधणार आहे. त्यामुळे जर ऑस्ट्रेलियाच्या सरकारने परवानगी देत रोहित आणि इशातं यांचा क्वारंटाइन कालावधी कमी केला तर हे दोघे पूर्ण कसोटी मालिकाही खेळू शकतील."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pYdihD
No comments:
Post a Comment