रांची: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेणारा भारताचा माजी कर्णधार आता मनोरंजन क्षेत्रात येणार आहे. धोनीने १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतील होती. त्यानंतर तो आयपीएलच्या १३व्या हंगामात खेळला. आता चित्रपटातून अभिनय करताना दिसणार आहे. वाचा- धोनी स्वत:च्या प्रोडक्शन हाऊस धोनी एंटरटेनमेंटद्वारे अघोरी या चित्रपट/वेब सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी धोनीची पत्नी साक्षी धोनीने सोशल मीडियावर यासंदर्भात माहिती दिली होती. वाचा- या चित्रपटातील अन्य कलाकारांची अद्याप निवड झाली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाचा विषय सायन्स फिक्शन असणार आहे. एका बेटावर काही जण अडकले आहेत अशी चित्रपटाची कथा असेल. ज्या लेखकाने याची कथा लिहली आहे ती त्याची पहिली स्टोरी आहे. धोनीच्या कंपनीने याआधी रोर ऑफ द लायन या डॉक्यूमेंट्रीची निर्मिती केली होती. वाचा- धोनीच्या आधी भारताच्या अनेक क्रिकेटपटूंनी चित्रपटात काम केले आहे. यात संदीप पाटील, विनोद कांबळी, सचिन तेंडुलकर, एस श्रीसंत, अजय जडेजा, सलील अंकोला यांचा समावेश आहे. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/375zSwh
No comments:
Post a Comment