माउंट मोइनगुई: वेस्ट इंडिजचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघात टी-२० मालिका सुरू असून दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने ७२ धावांनी विजय मिळवत मालिका २-० अशी जिंकली. या सामन्यात न्यूझीलंडकडून एक विक्रमाची नोंद झाली. वाचा- दुसऱ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजने टॉस जिंकला आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडची सुरुवात फार चांगली झाली नाही. पण त्यानंतर ग्लेन फिलिप्सने ४६ चेंडूत शतक झळकावले. त्याने न्यूझीलंडकडून सर्वात वेगवान शतक करण्याचा विक्रम केला. फिलिप्सने कॉलिन मुनरोचा ४७ चेंडूतील शतकाचा विक्रम मागे टाकला. वाचा- या शतकी खेळीत ९ चौकार आणि ८ षटकार मारले. फिलिप्सने ५१ चेंडूत १०८ धावा केल्या. विशेष म्हणजे फिलिप्सने करिअरमधील पहिले शतक झळकावले. त्याच्या या स्फोटक खेळीमुळे न्यूझीलंडने ३ बाद २३८ अशी मोठी धावसंख्या उभी केली. न्यूझीलंडकडून कॉलिन मुनरोने २०१८ साळी याच मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध ४७ चेंडूत शतक केले होते. वाचा- फिलिप्स आणि कॉन्वे यांनी चौथ्या विकेटसाठी १८४ धावांची भागिदारी केली. न्यूझीलंडकडून टी-२० मध्ये झालेली ही सर्वोत्तम भागिदारी आहे. याआधी मार्टिन गप्टिल आणि केन विलियमसन यांनी २०१६ साली १७१ धावांची भागिदारी पाकिस्तानविरुद्ध केली होती. वाचा- टी-२० मधील सर्वात वेगवान शतक डेव्हिड मिलर- ३५ चेंडूत रोहित शर्मा- ३५ चेंडूत
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fLWENv
No comments:
Post a Comment